रशियाने पोलंडवर क्षेपणास्त्र डागल्याने नाटो आक्रमक

51

रशियाने पोलंडवर क्षेपणास्त्र डागल्याने नाटो आक्रमक

रमेश कृष्णराव लांजेवार

मो.नं.9921690779

नागपूर: गेल्या 9 महिन्यांपासून सुरू असलेला युक्रेन-रशिया संघर्ष शिगेला पोहोचला आहे आणि आता रशियाचे क्षेपणास्त्र थेट पोलंडवर पडल्याने हा संघर्ष आता नाटो विरूद्ध रशिया अशी होण्याची दाट शक्यता आहे.यामुळे तिसऱ्या महायुध्दाची चिंगारी केव्हाही भडकु शकते.पोलंड हा नाटोचा सदस्य देश आहे.त्यामुळे नाटो सदस्य देशांवर हल्ला म्हणजे संपूर्ण नाटो देशांवर हल्ला असे नाटोच्या नियमानुसार गृहीत धरल्या जाते.त्यामुळे नाटो देश रशियाच्या विरूद्ध आक्रमक पवित्रा घेऊ शकते याला नाकारता येत नाही.

एकीकडे जी-20 शिखर परिषद सुरू असतांना व यात वैश्विक अर्थव्यवस्थेवरील दिशा आणि दशा यावर विचार विमर्श करण्यासाठी जागातील 20 मोठे देश (जी-20) इंडोनेशियाच्या बाली शहरात शिखर सम्मेलनात युक्रेन-रशिया युद्ध यावर सुध्दा चर्चा सुरू होती.या बैठकीत रशिया कडुन व्लादिमीर पुतिन यांच्या ठिकाणी विदेश मंत्री बैठकीला होते.या बैठकीत पुर्णपणे युद्धावर चर्चा हावी रहाली.तर दुसरीकडे रशिया युक्रेनवर क्षेपणास्त्रांचे ताबडतोब हल्ले चढवत होता.रशियाने युक्रेनच्या 12 शहरावर एकाच वेळी 100 क्षेपणास्त्रे डागली यातील एक क्षेपणास्त्र पोलंडमध्ये पडल्याने नाटोमध्ये आक्रोश निर्माण झाला आहे.यात पोलंडचे मोठे नुकसान झाले व दोन लोकांचा मृत्यू झाला.

कोणत्याही नाटो देशावरील रशिया कडुन झालेला हा पहिलाच हल्ला समजल्या जात आहे.त्यामुळे अमेरिकेसह संपूर्ण नाटो देश ऍक्शन मोडवर आल्याचे दिसून येते.जर नाटो-रशिया आमने-सामने आले तर तिसरे महायुद्ध अटळ आहे याला कोणीही रोखू शकणार नाही.त्यामुळे हे युद्ध केव्हाही भयावह रूप धारण करू शकते.कारण पोलंड वर डागलेले क्षेपणास्त्रे रशियाने डागली असल्याचे युक्रेनचे म्हणने आहे व नाटोलाही संशय आहे.त्यामुळे नाटो देश हायअलर्ट वर असल्याचे दिसून येते.

दिनांक 15 नोव्हेंबर मंगळवारला जी-20 चे संमेलन सुरू असताना रशियाने रात्री कीव, लवीव,खारकीव शहर,पोल्तवा, मेकोलिव, निप्रो, झेतोमर,लिव, चेक्कासे, ओडेसा आणि चेर्निहिव इत्यादी 12 शहरांवर एकाच वेळी 100 मिसाईले डागुन युक्रेनला मोठे नुकसान पोहोचविले.लवीव या पावर हाऊस वर रशियाने हल्ला केल्याने विज पुरवठा पुर्णपणे खंडीत झालेला आहे.या भयावह हल्ल्यामुळे अनेक शहरांची विज पुर्ती खंडीत झाली आहे व अनेक शहरांत अंधकार निर्माण झाल्याचे सांगितले जाते.सध्याच्या परिस्थितीत 12 शहराची हालत अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले जाते.रशियाने या अगोदर 10 आक्टोंबर 2022 ला एकाच वेळी 84 क्षेपणास्त्रे डागली होती आणि आणि आता15 नोव्हेंबरला 100 मिसाईल डागुन व पोलंड वर अटॅक करून तिसऱ्या महायुध्दाचा आलाराम रशियाने वाजविल्याचे दिसून येते.असे वाटत होते की युद्ध बंदी होवू शकते कारण दोन दिवस अगोदर खेरसॉन मधुन रशियाचे सैन्य मागे परतण्यास सुरूवात झाली होती यामुळे युद्ध विराम होण्याची शक्यता वाढली सुद्धा होती.परंतु मंगळवारला अचानक रशियाने 12 शहरांव 100 क्षेपणास्त्रे डागल्याने व एक क्षेपणास्त्र पोलंड डागल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे युक्रेनच्या अनेक शहरांमध्ये आपातकाल घोषित करण्यात आलेला आहे.

 युक्रेन-रशिया युद्ध दिवसेंदिवस भयावह रूप धारण करीत आहे.कारण रशियाचे आतापर्यंत एक लाख पेक्षा जास्त सैन्य या युद्धात मारल्या गेले त्यामुळे व्लादिमीर पुतिन मागे हटण्यास तयार नाही.परंतु जागतिक शांततेसाठी जी-20 देशाने कूटनीतीचा वापर करून ताबडतोब रशिया- युक्रेन मधील युद्ध थांबविले पाहिजे.कारण युद्धामुळे कोणत्याही प्रकारचा समाधानकारक मार्ग निघणार नाही हेही तेवढेच सत्य आहे.त्यामुळे जी-20 देशांनी ताबडतोब युद्ध थांबविण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करायला हवेत.अन्यथा अनर्थ होऊ शकतो.कारण आज जगाला युध्दाची गरज नसुन शांततेची गरज आहे.