माणगांव तालुका स्तरीय स्पर्धेत कस्तुरी दिवेकर व रासी मोदी या विद्यार्थीनी तालुका क्रीडा स्पर्धेत बाजी मारली

50

माणगांव तालुका स्तरीय स्पर्धेत कस्तुरी दिवेकर व रासी मोदी या विद्यार्थीनी तालुका क्रीडा स्पर्धेत बाजी मारली

सचिन पवार

रायगड ब्युरो चीफ

मो: 8080092301

रायगड :-रायगड जिल्हा क्रीडा परिषद अंतर्गत माणगांव तालुका क्रीडा स्पर्धा, खर्डी येथील क्रीडा संकूल येथे पार पडल्या. त्या स्पर्धेत माणगांव तालुक्यातील 26 शाळेनी सहभाग घेतला होता या स्पर्धेत अंडर 14, अंडर 17 व अंडर 19 मुला मुलीचा समावेश होता.

या स्पर्धेत गणेश यशवंत वाघरे इंग्लिश मेडीयम स्कूल ची कस्तुरी कृष्णा दिवेकर हिने 100 मीटर रनिंग मध्ये 17 वयोगट मुलींमध्ये 17 वयोगटाखालील मुलींना मागे टाकत प्रथम क्रमांक पटकवला त्याच प्रमाणे काल झालेल्या ना. म. जोशी विद्यालय गोरेगाव येथे तालुका लेवल चेस (बुद्धिबळ ) स्पर्धेत अंडर 17 वयोगटातील मुलींमध्ये रासी हेमंत मोदी या विद्यार्थीने बुद्धिबल स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकवला या दोन्ही विद्यार्थी रायगड जिल्हास्तरीय स्पर्धेत पात्र ठरल्या आहेत या स्पर्धेसाठी दि.23 नोव्हेंबर रोजी खालापूर येथे होणाऱ्या रायगड जिल्हास्तरीय स्पर्धेत कस्तुरी दिवेकर व रासी मोदी याची निवड झाली आहे.

 या दोन्ही विद्यार्थी चे गणेश यशवंत वाघरे च्या मुख्याध्यापिका सौ मनीषा मोरे मॅडम साधना गावंडे मॅडम स्नेहल रातवडकर मॅडम,वाढवलं सर, सचिन पवार, सुर्वे सर त्याच प्रमाणे शालेय शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी पुष्पगुछ देऊन कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.