सुकापूर येथे हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधुन मोफत आरोग्य शिबीर व रांगोळी स्पर्धा
✍सचिन पवार ✍
रायगड ब्युरो चीफ
📞8080092301📞
पनवेल :-मोफत आरोग्य शिबिराचे उदघाटन शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख मा.श्री.शिरीष दादा घरत यांच्या हस्ते सकाळी करण्यात आले रांगोळी स्पर्धेचे जिल्हासंपर्क प्रमुख बबनदादा पाटील हस्ते वितरण.नुकताच १७ नोव्हेंबर हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिन झाला त्याचे औचित्य साधून रविवार दिनांक २० नोव्हेंबर रोजी सूकापुर येथे मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते तसेच रांगोळी स्पर्धा ही आयोजित केली होती यामध्ये विजयी झालेल्या स्पर्धकांचा रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले हे आरोग्य शिबिर आकृती सोसायटी सुकापुर येथे आयोजित करण्यात आले होते या शिबिराचा लाभ शेकडो नागरिकांनी घेतला
या शिबिराला शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी उपस्थित राहून वंदन केले भेट दिली.तसेच ज्ञानेश्वर बडे आदी सह अनेक नेत्यांनी उपस्थित राहिले होते
या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना उपविभाग प्रमुख जयंत पाखरे, हेमंत म्हात्रे, विशाल भोईर, दिनेश पाटील, सागर उपडे, हनुमंत खंडागळे, पुरुषोत्तम पाटील, राहुल केणी, सचिन खरात, ओम वारे, आदींनी केले होते तसेच यासाठी अनेक शिवसैनिक यामध्ये सहभागी घेतला होता.