स्पॉटलाईट: संस्कृतीची परिघे
विद्या य. प्रे. सरमळकर, MSW
मो: ९३२२९७२३४६
२४ नोव्हेंबर, विक्रोळी: भारताला वेगळी परंपरा लाभलेली आहे आणि या परंपरेला संस्कृती ची परीघ आखण्यात आली आहेत. वेगवेगळ्या धर्मांची आपापल्या सोयीची चाकोऱ्या आखल्या आहेत, जात-वर्ग-प्रांत यानुसार थोड्या अधिक फरकाने परंपरा रुजवली आहे. या सगळ्यात स्त्री व पुरुषांच्या भावनांचा विचार न करता समाजातील चालीरीतींना महत्व दिले आहे, दोन वेगळ्या देहाला सातत्याने वेगळे मापदंडात मोजल गेलं आहे. त्यांपैकी आज धार्मिक अंगाचा आपण विचार करू;
हिंदू धर्मातले महाकाव्य श्रीमद् भागवत गीता, रामायण आणि महाभारत
श्रीमद् भागवत गीता मध्ये असे वर्णन केले आहे कि, कृष्ण हा नदीवर आंघोळीसाठी गेलेल्या गोपिकांचे कपडे पळवतो किंवा लपवतो, याचा मागचा भावार्थ काय असेल याचा विचार आपण करायला हवा, आज याकाळात जर असे कुणी केले तर त्याला पोलीस ठाणे आणि कायद्याची पकड यामधून स्वःतला सिद्ध करावे लागेल कारण याला आजच्या युगात छेडछाड, विनयभंग असे गंभीर आरोप म्हणून पाहण्यात येईल. मग त्याही काळात हे वागण अयोग्य असेल किं नाही- हे वागण गुन्हा असेल कि नाही. जर असेल तर आपण याच समर्थन केल पाहिजे का? मात्र ज्यांना वाटत हे काही गुन्हा नाही तर त्या गोपिका यशोदा कडे कृष्णाच्या तक्रारी घेवून का जायच्या याचा विचार व्हायला हवा. जर त्या गोपिकांना ते छेडण आवडत नव्हत तर मग ती जबरजस्ती बळजबरी योग्य होती का? त्यांना विवस्त्र चोरून पहाण खरच देवाला म्हणजे कृष्णाला शोभत होत का? डोक्यावरील दुधादह्याच्या माठ फोडण्यात काय आला पुरुषार्थ; लोकांच्या आर्थिकतेचे होणाऱ्या नुकसानच काय GST नसली तरी राजाच्या दरबारात भेट वस्तू आणि शेतसारा देण्याची प्रथा होती. असा लोकांचे नुकसान करणाऱ्या देवाचे अनुयायी आजच्या काळात सर्वच क्षेत्रात आहेत.
याच गीतेत कृष्णाने १६ सहस्त्र महिलासोबत लग्न रचलेले नमूद केले आहे आणि असेही म्हटले आहे कि त्याने गोपिकांसोबत रास लीला रचली, यासगळ्याचे आपण समर्थनही केले आहे. कृष्ण हा देव आहे म्हणून त्याला स्त्रियांचा उपभोग घ्यायचा अधिकार आहे, हे सांगणारा ग्रंथ हा अधिकार सर्वच पुरुषांना पाशवीपणा तर बहाल करत नाही ना. बाई हि उपभोगाची वस्तू आहे ती नात्याने कुणीही असो, तीला कधीच आणि कोणत्याही पुरुषाला नाही म्हणायचा अधिकार नाही आणि जर अस केलं तर त्याला नकार दिला म्हणून तीला कोणतीही शिक्षा करण्याचा हि अधिकार पुरुष योनीतून जन्म घेतल्यामुळे प्राप्त झालेला दिसून आला आहे.
दुसर अस कि, रामायण हे महाकाव्य आहे असे शाळेत शिकवले गेले. या रामायणात रामासोबत सीतेचा आणि लक्ष्मणाचा वनवास दाखवला आहे, लक्ष्मणाला एक स्त्री सुंदर आहेस अस म्हटल्यावर त्याने तिचे कान, नाक, स्तन कापले- हा कुठला न्याय. आणि कोणता भाऊ आपल्या बहिणीवरील अत्याचार दुर्लक्षित करील. त्यानेही बदला घेण्याचा विचार केला (इथे एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे, ती म्हणजे एक भाऊ दुसऱ्या भावासोबत वनवासात जातो तो खूप महान आणि दुसरा भाऊ बहिणीच्या अवयव कापलेल्या अत्याचाराविरोधात बदला घेतो ते दुर्लक्षित केल जात) बदला घेताना तो सीतेला पळवून आणतो मात्र, तिच्या संमतीच्या विरोधात न स्पर्श करत, महिला दासिसमावेत ठेवले आणि सीतेला परत आणल्यावर तिची अग्नी परीक्षा घेऊन पवित्र तपासले गेले, राम तिच्या पाठिमागे एकटाच होता त्याच्या शीलावर-चरित्रावर सीतेने आणि आम्ही रामायण वाचताना हि संशय घेतला नाही, रामायणामध्ये सीतेच्या पवित्राविषयी चर्चा झाली आणि अशोक वाटिकेतील बरेच दासिंसोबत चे दाखलेही आहेत मात्र, रामाचे चरित्र जपाण्याविषयी न चर्चा ना काही मुद्दा मांडला आहे, यावरून एकच निष्कर्ष दिसतो कि, शील-चरित्राचे पवित्र हे स्त्रीलाच असल्याचे या धार्मिक पुराणामधून जनमाणसात रुजवण्याचा प्रयत्न झालेला आहे. यावरच सगळ संपत नाही तर तीला गर्भार्वस्थेत एकटीला घरातून हाकलून दिल जात. ‘गर्भ धारणा कधी व कशी झाली हे तरी रामाला माहित असाव ना.’ मग का सीतेने विरोध केला नाही हा प्रश्न राहून रहून पडतो, हि स्त्री गप्प राहून सहन करण्यची व्यवस्था तिच्या अगोदर पासून अस्तित्वात होती आणि तिने ती बहुतेक पाळली असावी. पण आज हि सीतेच्या नावाने का महिला ह्या अशा प्रथा-परंपरा पाळतात, कळत नाही. सीतेकडे कायद्याचा आधार नव्हता, न सुरक्षा यंत्रणा होती(पोलीस ठाणे), नाही महिला संघटना. रामाकडे मात्र राज्याचे दरबार होते आणि शिपाई सुद्धा, सोबत पितृसता सुद्धा. अशा परिस्थिती रावण जो परस्त्री ला स्पर्श हि करत नाही आणि युद्धात हरणार असूनही मरण पत्करतो यापेक्षा राम कसा ग्रेट हे आम्ही वाचतो आणि स्वीकारतो. यामुळेच आज आपण महिलेंवर हिंसा करतो आणि घराबाहेर काढतो. कारण आदर्श रामाने हा आदर्श घालून दिला आहे. जर रावणाला समजून घेतलं असत तर परस्त्री कडे सन्मानाने पाहिलं असतं तिचा विनयभंग हि केला नसता ना तिच्यावर बलात्कार केले नसते. बहिणींच्या मानसन्माचा विचार केला गेला असता, तीला संपत्तीत वाटा देताना आमच्या जीवावर आल नसतं, बहिणीला कुणी छेडत असतं तर बहिणीचेच शिक्षण बंद झाल नसतं. हे सगळ आम्ही निवडलेल्या देवांच्या आदर्शाचे धडे जगताना गिरवत आहोत म्हणून महिलांवरील हिंसेचं आम्ही समर्थन करतो कारण, आमचा देवांची शिकवणच ती आहे आणि लाभलेला दैवितिहास.
द्रोपदी हि स्त्री होती म्हणून तीला वाटून घेण्याची आज्ञा झाली होती का? जर पाच पांडव द्रव्य आणत आणि कुंती आपापसात वाटून घे अस सांगत होती तर मग द्रोपती हि वस्तू हे आपण सर्वांनी कस मान्य केल? कि हाच आपला दृष्टीकोन इथूनच विकसित झालां आहे. बर, कुंती हिचे शब्दनशब्द प्रमाण मानून ऐकणाऱ्या याचं पाच पांडवानी सर्वात थोरला भाऊ कर्ण याला का स्वीकारले नाही, तिथे कुंती लगेच आई ची कुलटा आणि कुलाक्षनी झाली असती का? कुंती ने लग्ना अगोदारचे आपत्य ना नाकारले? कुमारी माता हे त्यावेळी हि गुन्हा होता का? म्हणजे आज समाजात प्रचलित असलेल्या सर्वच चालीरीती ह्या पूर्वापार चालत आलेल्या आहेत आणि याची बांधणी म्हणजे मुहूर्त मेढ याच देव आणि देवीनी रचली आहे, त्याशिवाय काय आपल्या समाजात निरंतर त्याच त्याच चालीरीती पिढ्यानपिढ्या चालत राहिल्या असत्या. स्त्रियांच्या लैगिंगतेवर बंधन हि धार्मिक ग्रंथांत अशा बऱ्याच घटनांतून नमूद केलेली दिसून येते. एका स्त्री चा ५ पुरुषांनी उपभोग घेणे हि व्यवस्था हि याच धर्म ग्रंथातून जनमानसाच्या मेंदूंत रुजवली आली, बाईपणाचे ओझे योनिद्वाराकडे येऊन थांबले. बायीपणातून आजही म्हणून स्त्री यांची सुटका होऊ शकली नाही आणि ती माणूस होण्याअगोदर जन्मापासूनच बाई म्हणून बंदिस्त केली जाते; कुठे सौंदर्याच्या नावाने, कुठे गरिबीच्या नावाने तर कुठे वासनेच्या आवेशाने. हा प्रदीर्घ इतिहास देवांचाच आपण आपल्या अंगी कारला आहे आणि जर देवच माणसाला हे असं सतत खदखदत रहाणार-अग्नीदाह देत असेल तर मी नाही मानत असल्या देवाला. जो देव सतत जन्मापासून मरणापर्यंत नरक यातना देत असेल तर मी नाही मानणार असा देव. का देवाने स्त्री ला फक्त रडायला शिकवलं, का देवाने स्त्री ला कालिका-चंडिका होऊन स्वःरक्षणाचे मूलाधार दिला नाही. पाच नवरे असणारी द्रोपदी का डावावर लावली का ५ जणांपैकी एका तरी पुरुषाला डावावर लावलं नाही, म्हणजे बाई उपभोगाची वस्तू हे महाभारतात हि लिहिलेलं आहे म्हणून सामाजात आजही तिच्याच अब्रूची लकतरे काढली जात आहे, देहाचा व्यापार केला जात आहे. कृष्णाने का द्रोपदीला साडी पुरवली त्याएवजी लढण्याची दुर्गा-महिषासुर मर्दिनी होण्याची शिक का दिली नाही. याचा विचार व्हायला पाहिजे, आजवर असे असंख्य किस्से आपण वाचताना दुर्लक्षित केले आहेत आता तरी हे धर्म ग्रंथ वाचताना शास्त्रोक्त दृष्टीकोन समोर ठेवून वाचायला हवे आणि योग्य त्या दुरुस्त्या करून पुढच्या पिढीला सोपवायला हवेत नाहीतर अजून किती करोडो गोपिका छाळल्या जातील आणि किती द्रोपती लुटल्या जातील हे सांगण अवघड आहे आणि सीता म्हणून प्रत्येक स्त्री ला जन्मासोबत वनवास देवू हे मोजता येणार नाही.
मीडियावार्तावर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, भाष्य, टीका याच्याशी संपादकिय मंडळ व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
मीडियावार्तच्या बातम्या, लेख, व्हिडिओ आणि रोजगार अपडेट्स व्हॉट्सॲप वर मिळवण्यासाठी क्लिक करा ⬇️
https://linktr.ee/mediavarta