सायन कोळीवाडा येथे ‘शालेय साहित्य वाटप’ समारंभ संपन्न

50

सायन कोळीवाडा येथे ‘शालेय साहित्य वाटप’ समारंभ संपन्न 

गुणवंत कांबळे, मुंबई प्रतिनिधी

मो. नं.९८६९८६०५३०

मुंबई – दि. 24 नोव्हेंबर 2022 रोजी रात्री 8.00 वाजता सायन कोळीवाडा मधील बिएमसी बिल्डिंग क्र ई-३ च्या मागील प्रगती चाळ कमिटी मधील स्थित असणारे बौध्दजन पंचायत समिती, शाखा क्र. 522 संचालित 

“श्रावस्ती बुध्द विहार ” येथे बौध्दाचार्य जितेंद्र स. कांबळे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेली 

‘साप्ताहिक बुध्द वंदना’ निमित्ताने 

बौध्दजन पंचायत समिती शाखा क्र. 639 चे अध्यक्ष आणि कांबळे गुरुजींचे मामा “कालकथित गंगाराम तुकाराम पवार (गोविळकर) यांच्या 

स्मृती प्रित्यर्थ त्यांचे पुतणे आयु. नरेश मधुकर पवार यांच्या हस्ते 50 शालेय विद्यार्थ्यांना “शालेय साहित्य वाटप” करण्यात आले.

तसेच, बौध्दजन पंचायत समिती, शाखा क्र. 522 संलग्न माता रमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा 

सौ. आरतीताई दिनेश कांबळे (ईस्वलकर) यांच्या वाढदिवसानिमित्त

“अल्पोपहार वाटप” करण्यात आले. 

ह्यावेळी शाखेचे प्रमुख सल्लागार शरद कांबळे (हातखंबकर), महिला मंडळ सचिव सौ. जान्हवी जितेंद्र माजळकर, प्रणाली अशोक खानविलकर आणि महिला मंडळ कार्यकारिणीसह बाल उपासक – उपासिका बहुसंख्येने उपस्थित होते. 

बुध्द विहारामध्ये भावी पिढींचा ओघ वाढावा, बालवयात आदर्श बौध्द संस्काराची घडण व्हावी आणि स्मृती प्रित्यर्थ किंवा वाढदिवसाच्या निमित्ताने दान पारमिता संपादित व्हावे, ह्या उद्देशाने बौध्दाचार्य जितेंद्र कांबळे गुरुजी यांच्या संकल्पनेतून नविन विचार रुजविला जात आहे. 

हा संकल्प सर्वत्र व्हावा, ह्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे आवाहन कांबळे गुरुजींनी उपस्थितांना ह्या प्रसंगी करून दानवीरांचे आभार मानले.