कांग्रेस कार्यालयात संविधान दिन साजरा, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान दिनी अभिवादन

56

कांग्रेस कार्यालयात संविधान दिन साजरा. भारतीय घटनेचे शिल्पकार डा बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान दिनी अभिवादन

बाबा मेश्राम 

सावली तालुका प्रतिनिधी

मो:7263907273

सावली: महामानवाने रचिला पाया संविधानाचा !स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुतेचा !! जगी असे महान संविधान भारताचे ! लोकशाही, धर्मनिरपेक्ष, समाजवादी,महाराष्ट्राची माती प्रजासत्ताकाचे !!. जिथे माणसा माणसात भेद आहे त्या पुस्तकाचे नाव “वेद” आहे. जिथे प्रत्येक व्यक्ती समान आहे त्या ग्रंथाचे नाव “संविधान” आहे. भारतीय राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संसदीय विधिमंडळात स्वीकारल्या गेली, म्हणुनच आज संविधान दिन म्हणून साजरा करतात.

बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या रक्ताची शाई करून आपल्या शरीराची पर्वा न करता 2 वर्षे 11 महिने 18 दिवस एवढ्या कालावधीत 395 कलमे व 8 परिशिष्टे लिहून जगातील महान बलशाही राज्यघटना लिहली आशा महामानवाला त्रिवार अभिवादन करण्यासाठी सावली तालूका काँग्रेस कमिटी तर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला.यावेळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार व पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन तालुकाध्यक्ष श्री.नितीन भाऊ गोहाणे यांनी केले.

प्रमुख उपस्थिति म्हणून सावली काँग्रेसचे शहराध्यक्ष व नगरसेवक विजय मुत्यालवार , सौ.लताताई लाकडे नगराध्यक्ष न.प.सावली, सौ.भारती चौधरी शहराध्यक्ष महिला आघाडी, प्रीतम गेडाम नगरसेवक , सौ.साधना वाढई नगरसेविका, सौ.ज्योती गेडाम नगरसेविका, सचिन सन्गिडवार नगरसेवक , सुनील पाल , प्रवीण बोटकावार, शरद कन्नाके ,अरविंद वैराळे, सौ. संगीता गेडाम, सौ. भावना बोरकर ,अंजली दमके आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार कमलेश गेडाम, तालुकाध्यक्ष सोशल मीडिया प्रमुख सावली यांनी मानले.