भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोंकण टूर सर्कीट कार्यक्रमाचा शुभारंभ. चवदार तळे / गंधारपाले लेणी – सहल एका ऐतिहासिक पर्वाची

53

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोंकण टूर सर्कीट कार्यक्रमाचा शुभारंभ. चवदार तळे / गंधारपाले लेणी – सहल एका ऐतिहासिक पर्वाची.

सचिन पवार 

रायगड ब्युरो चीफ

मो: 808009230

रायगड :-महाराष्ट्र पर्यटन संचालनालय कोकण विभाग व रायगड जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किट सहल व सांस्कृतीक कार्यक्रमाचा शुभारंभ आज महाड येथिल चवदार तळे या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व अस्पृश्यता निवारणाची नांदी जेथे झाली तेथे करण्यात आला. त्याच प्रमाणे चवदार तळे, डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील सभागृह येथे विविध सांस्कृतीक कार्यक्रम संपन्न झाले. बार्टी येथे संविधान गौरव परीक्षेचे व प्रा. डाॅ वाघमारे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. 

२६ नोव्हेंबर संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन म्हणून भारतभर साजरा केला जातो. संविधान दिनाचे औचित्य साधत चवदार तळे, महाड येथे मा. श्री. किसन जावळे (अतिरिक्त विभागीय आयुक्त कोंकण विभाग) याचे हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोकण टूर सर्किटच्या लीफलेटचे आणि संस्कृती कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत रायगड जिल्ह्यातील महत्त्वाची स्थळे व बौद्ध लेण्यांवर आधारित टूर सर्कीट तयार करण्यात आले आहे. 

या कार्यक्रमास कोकण विभागाचे उपसंचालक पर्यटन श्री हनुमंत हेडे , उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी महाड श्रीमती प्रतिमा पुदलवाड , तहसिलदार महाड श्री सुरेश काशीद , मुख्याधिकारी महाड श्री महादेव रोडगे, गट शिक्षणाधिकाऱी श्रीम सुनिता चांदोरकर, कोंकण मराठी साहित्य परिषद, चवदारतळे साहित्यमंच , चवदार तळे विचारमंच, महाड तालुका गृहनिर्माण संस्था महासंघ चे सर्व पदाधिकारी, शिक्षकवृंद, विद्यार्थी व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमास उत्तम प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती श्री. हनुमंत हेडे – संचालक कोकण विभाग पर्यटन संचालनालय यांनी दिली. 

*चवदार तळे माहिती*

महाड सत्याग्रह हा २० मार्च १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्हयातील महाड येथील सार्वजनिक चवदार तळयाचे पाणी अस्पृश्यांना घेता यावे म्हणून केलेला सत्याग्रह होता. यामुळेच २० मार्च हा दिवस “सामाजिक सबलीकरण दिन ” म्हणून भारतात साजरा केला जातो. ही डाॅ बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली लोकांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन केलेली ही पहिली सामायिक कृती होती.

गंधार पाले लेणी माहिती

३ चैत्यगृह व १९ विहार आहेत.

लेणे क्र. १ मध्ये ५३ फुट लांब व 4 फुट रुंद ओसरी आहे. गर्भगृहात गौतम बुद्ध यांची मुर्ती व धम्मचक्र कोरलेली आहेत. लेणे क्र. २१ मध्ये गौतम बुद्ध यांची बसलेली मुर्ती, त्यांचे शिष्य व हरिणाची चित्र कोरली आहेत.

येथील शिलालेख नुसार ही लेणी बौद्ध धर्मीय कुंभोज वंशिव राजा विष्णू पुलित यांच्या कारकीर्दित ई.स. १३० च्या आसपास निर्माण केली गेली. 

येथील शिलालेखानुसार ई.स. बौद्ध संघाला सावकारांकडून देणगी व जमिनी मिळाल्याची नोंद आहे.