संविधान गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा
गुणवंत कांबळे, मुंबई प्रतिनिधी
मो. नं.९८६९८६०५३०
मुंबई- २६/११/२०२२ रोजी महापालिका वसाहत भगतसिंग रोड फोर्ट मार्केट येथे बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 11 एकता महिला मंडळ आणि धम्मचक्र मित्र मंडळ यांच्या माध्यमातून 73 वा संविधान गौरव दिन मोठ्या आनंदोत्सवात साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आयु. राजेश पवार सर तसेच प्रमुख प्रवक्ते माननीय न्यायाधीश विजय प्रल्हाद गायकवाड सर आणि वार्ड क्रमांक 225 च्या विद्यमान नगरसेविका सौ.सुजाताताई दिग्विजय सानप यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.