मी माझे कर्तव्य केले आहे, तुमच्या सोबत असे होऊ नये यासाठी… “दक्ष नागरिक बना”

64

मी माझे कर्तव्य केले आहे, तुमच्या सोबत असे होऊ नये यासाठी… “दक्ष नागरिक बना”


सामाजिक कार्यकर्ते मा.मितेश वळंजू यांनी आपल्या मीडिया वार्ता न्यूज वृत्तपत्र प्रतिनिधीला माहिती देताना कोणत्याही परिस्थितीत सोशल मीडिया अफवांवर विश्वास ठेवू नका, सत्य-असत्य तपासून पहा असाच एक प्रसंग निदर्शनास घडताना…?
सावधान…! सावधान…!! सावधान…!!!
Instagram Scam alert
सावधान ! मंडळी “ be our brand ambassador” असा बनवाबनवी चा प्रकार सुरू आहे. यात फोटोमध्ये असल्यासारख्या आधी तुम्हाला अनोळखी व्यक्तीचा मेसेज येतो, तो तुम्हाला एखाद्या कंपनीमार्फत तुम्हाला संपर्क करत आहेत असे सांगतात आणि कंपनीच्या मुख्य पेजवर मेसेज करायला सांगतात. तिथे मेसेज केल्यावर त्यांचा रिप्लाय म्हणजेच मेसेज येतो, ते असं भासवतात की ते पृथ्वीला वाचवण्यासाठी एक उपक्रम राबवत आहेत. त्याचा एक उत्पादन आहे, जे जगाला प्लस्टिक मुक्त करेल आणि यासाठी तुमच्या सहभागाची गरज आहे, आमच्या या उत्पादनाचा तुम्हाला प्रचार करायचा आहे.
तुम्हाला ही मनातून गुदगुल्या होतात. (मला ही झाल्या)सगळं भारी वाटत मी जग वाचवण्यासाठी कामी येणार मी एका कंपनीचा ब्रँड अँबँसडर होणार, सगळे वाह-वाह करणार, मला पैसे मिळणार, मग मैगझिन मध्ये फोटो, वगैरे वगैरे…….बरं यासाठी तुम्हाला त्यांचे उत्पादन विकत मागवावे लागते. ते ही उच्च किमतीवर जगाला वाचविण्यासाठी एवढं तर करूच शकतो ,असा विचार मनात येतो तुम्ही पैसे भरता, ऑर्डर करता आणि कुरियर तुमच्या पत्त्यावर पोचण्याची वाट पाहता.खूप दिवस झाले तरी ऑर्डर येत नाही तुम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न करता पण जेवढया तत्परतेने आधी मेसेज आलेल्या असतो तेवढया तत्परतेने त्याचा रिप्लाय येत नाही. तुम्ही वाट पहात राहता आणि मग आपण बनले गेलो आहोत. हे लक्षात येते काय ते सांगायची गरज नाही. या सगळ्यात ज्या अनोळखी व्यक्तीने आपल्याला मेसेज केलेला असतो त्याचे एकही इन्स्टाग्राम फॉलोवर नाही आणि त्या पेजवर एकही पोस्ट नसते हे थोडं निरीक्षण केल्यावर लक्षात आले.

मला कसं कळलं ? सवयीचा गुण , सोशल मीडियावर जास्त असल्याने म्हटलं कंपनी एवढं महान कार्य करत आहे.आणि आपल्याला कसं कळलं नाही. पण यावेळी गुगलवर शोधलं नाही. युट्यूबवर शोधलं आणि हा प्रकार समोर आला.

मी माझे कर्तव्य पार पाडले आहे. तुमच्या सोबत असे होऊ नये यासाठी पूर्ण माहिती तपासू पहा आणि सत्य-असत्य आहे तेही संशोधन करणे गरजेचे आहे. दुसऱ्या सोबत असे होऊ नये कुणी फसले जाऊ नये एक प्रयत्न करत आहे. यासाठी आपण सगळ्याने काळजी घेणे आवश्यक आहे आणि “दक्ष नागरिक” होणे महत्त्वाचे आहे.
मीडिया वार्ता न्यूज च्या माध्यमातून जनजागृती होण्यासाठी सामान्य माणसा पर्यंत हा संदेश कळावा ही अपेक्षा…