स्वराज्य करिअर अकॅडेमी माणगांव मधून तीन विद्यार्थ्यांची भारतीय सैन्य दलात भरती
सचिन पवार
रायगड ब्युरो चीफ
मो: 808009230
माणगांव :-स्वराज्य करिअर अकॅडेमी माणगांव चा मान राखत भारतीय सैन्य दलात भरती झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी स्वराज्य करिअर अकॅडमी चे संस्थापक अध्यक्ष परेश कोटकर व विद्या खिडबीडे यांनी कौतुक करून अभिनंदन केले.
याप्रसंगी स्वराज्य करिअर अकॅडमी चे संस्थापक अध्यक्ष परेश कोटकर व खिडबीडे मॅडम याच्या उपस्थितीमध्ये अकॅडमी चे तीन विद्यार्थीचे स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
माणगांव तालुक्यातील तीन विद्यार्थी हे सौरभ पवार करबेली माणगांव, आदेश गुगळे निलगून माणगांव व दीपेश्वर शिंदे सुरव माणगांव तालुक्यातील असून त्याची भारतीय सैन्य दलात नियुक्ती झाली आहे. स्वराज्य करिअर अकॅडमी मध्ये वर्षभर मेहनत करून आज दिनांक २७ नोव्हेंबर रोजी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याच्या या यशाला संपूर्ण स्वराज्य करिअर अकॅडमी चे विद्यार्थी शिक्षक त्याच प्रमाणे माणगांवकर कडून अभिनंदन करण्यात आले आहे.व पुढील कार्यक्षेत्रसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.