खोपटा-कोप्रोली मार्गावरील पेट्रोलपंप गोत्यात. रस्त्याच्या मध्यापासून नियमबाह्य बांधकाम, अनाधिकृत बांधकाम केल्याचा आरोप

पूजा चव्हाण

उरण, ३० नोव्हेंबर:

उरण पासून जवळच असलेल्या खोपटे कोप्रोली मार्गावरील होणारा पेट्रोल पंप कायद्याच्या कचाट्यात सापडलाय.संभाव्य पेट्रोल पंपाच्या बांधकामासाठी मंजुळा लक्ष्मण पाटील, दिनकर लक्ष्मण पाटील, मनीष ठाकूर,निशा मनीष ठाकूर, राहणार मौजे कचरेपाडा यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे 25 मे 2019 रोजी अर्ज केला होता.अर्जदारांची जमीन ही खोपटे कोप्रोली राष्ट्रीय महामार्ग 348 बीबी या रस्त्यालगत असून या रस्त्यावरून पेट्रोल पंपाला पोहोच मार्ग उपलब्ध होईल अशा प्रकारे आहे.

परंतु सदर पोहोच मार्गाची परवानगी स्वतंत्रपणे घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे खोपटे कोप्रोली हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग रस्ता आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याच्या कडेला असलेल्या पेट्रोल पंपांना पोहोच मार्ग बांधण्याकरता नियमावली ठरवून देण्यात आली आहे. सदर शासन निर्णयानुसार पेट्रोल पंपाच्या बांधकामामध्ये फ्युउल पंपाची ही इमारत रेषेपलीकडे असणे आवश्यक आहे.आय आर सी 73 मध्ये नमूद केल्याप्रमाणे तसेच फ्युउल स्टेशन ऑफिस बिल्डिंग इत्यादी या सुरक्षित अंतरावर अग्निशामक यंत्रणा किंवा अन्य सक्षम यंत्रणा नियंत्रण रेषेपलीकडे असणे आवश्यक आहे.

या नियमावलीनुसार अर्जदारांनी अजूनही जोड रस्त्याची परवानगी घेतलेली नाही.जोड रस्त्यावर शासन निर्णयात नमूद केले आहे,की पोहोच मार्गाच्या दोन्ही बाजूकडील मुख्य रस्त्याला जोडणारे ठिकाण कमीत कमी तीनशे मीटर अंतरापर्यंत असू नये. सध्या स्थितीत सदरच्या पेट्रोल पंपाचे ठिकाण हे खोपटे कोप्रोली रस्त्याच्या खोपटा पुलाकडून जाताना डाव्या बाजूस आहे. त्या ठिकाणावरून सुमारे 110 मीटर अंतरावर साखळी क्रमांक म्हणजेच इंटर सेक्शन पॉईंट असल्याने जोड रस्त्या करिता असलेल्या नियमावलीनुसार आवश्यक अंतर नाही.

वरील प्रमाणे नियमचित कार्यवाही दृष्टीने संबंधितांनी आवश्यक प्रस्ताव सादर करून परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र तोपर्यंत अशी परवानगी घेत नाहीत तोपर्यंत अर्जदारांनी सध्या स्थितीत पेट्रोल पंप बांधकामाचे चालू ठेवलेले काम बंद करणे आवश्यक आहे.या धोरणानुसार सार्वजनिक बांधकाम खात्याने नैनाचे सहयोगी नियोजन कार यांना सिडको भवन सी.बी.डी बेलापूर येथे पत्र पाठवून पेट्रोल पंपाच्या सध्या सुरू असलेल्या बांधकामाबाबत आपल्या स्तरावरून योग्य ती कारवाई करण्याची विनंती केली आहे.

सदरचे बांधकाम हे अनाधिकृत असल्याने अर्जदारांना वारंवार सूचना देऊन देखील बांधकाम न करता सुरूच ठेवले असल्याने शासकीय नियमांचा भंग होत आहे. तरी आपल्या स्तरावरून तातडीने योग्य ती कारवावी असे सार्वजनिक बांधकाम उपविभाग उरणचे उपविभागीय अधिकारी यांनी नैना सहयोगी नियोजन कार यांना पाठवलेल्या पत्रात शेवटी नमूद केले आहे . नैना म्हणजे नवी मुंबई विमानतळ प्रभावित अधिसूचित विभाग.सदर पत्र सार्वजनिक बांधकामाने ७ नोव्हेंबर 2022 रोजी नैनाला पाठवलेले आहे. तसेच प्रोसेस ठिकाणी आवश्यकतेनुसार पर्यावरण, आरोग्य विभाग, वन विभाग, अग्निशामक दल, संबंधी महामार्ग प्राधिकरण यांची परवानगी असणे गरजेचे असताना सुद्धा सदर अटीनुसार त्याची पूर्तता न केल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान संबंधित अर्जदारांनी पेट्रोल पंपांचे बांधकाम मध्यपासून ५०मीटर अंतर सोडून बघायची नियमावली असताना सुद्धा 31 मीटर अंतरावर सुरू केलेले आहे .ते नियमबाह्य आहे. भविष्यात याचा त्रास खोपटे गावाला होऊ शकतो. तरी या विरोधात उरण तहसीलदार,उरणचे पोलीस निरीक्षक, बांधपाड्याचे सरपंच, आणि पोलीस पाटील यांना तातडीने कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यांनाही बांधकाम रोखण्याबाबत सार्वजनिक बांधकाम उपविभागीय उरणचे उपविभागीय अधिकारी यांनी पत्र पाठवले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here