बल्लारपूर रेल्वे पुलासारखे आणखी कीती जिवघेणे पुल आहेत देशात?
रमेश कृष्णराव लांजेवार
मो.नं.9921690779
नागपूर: रेल्वे पूल अपघात म्हणजे रेल्वे प्रशासनाची निष्काळजीपणाच म्हणावा लागेल. कारण या पुलावरून प्रवाशांचे आवागमन होतेच यात दुमत नाही.परंतु रेल्वे कर्मचारी व अधिकारी सुध्दा या पुलावरून रोजच आवागमन करतात.तेव्हा रेल्वे प्रशासनाला ही बाब लक्षात का आली नाही की पुलांची हालत खस्ता होत आहे.यावरून स्पष्ट होते की सरकारला व रेल्वे प्रशासनाला कल्पना होती की बल्लारपूर रेल्वे ब्रिज खस्ता अवस्थेत आहे.तरीही रेल्वे विभागाने प्रवाशांसाठी खुला का ठेवला?असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात भेडसावत आहे.बल्लापुर रेल्वे ब्रिज पुलाला भगदाड पडल्याने 20 फुटांवरून 22 प्रवासी खाली कोसळले.यात 2 प्रवासी गंभीर जखमी झालेत तर 1 महिला प्रवासीचा मृत्यू झाला.हीबाब रेल्वे प्रशासनाच्या दृष्टीकोनातून दुर्दैवीच म्हणावी लागेल.
कोसळलेल्या पुलाला तब्बल 45 वर्षे झालीत.परंतु कोणाच्याही कसे लक्षात आले नाही की हा पुल खस्ता अवस्थेत आहे?म्हणजेच रेल्वे प्रशासनाला लोकांच्या जिवाची अजीबात पर्वा नसल्याचे स्पष्ट दिसुन येते.खस्ता अवस्थेतील हा फक्त बल्लारपूर (चंद्रपूर) चाच नाही तर अशीच अवस्था महाराष्ट्रातील अनेक रेल्वे पुलांची राहु शकते याला नाकारता येत नाही.त्याचप्रमाणे संपूर्ण भारतात मोठे रेल्वेचे जाळे आहेत.त्यामुळे बल्लारपूर रेल्वे पुलाची घटना लक्षात घेता भारतातील कीतीतरी पुल जिर्ना अवस्थेत असतील हे सांगणे कठीण आहे.त्यामुळे केंद्र सरकारने व रेल्वे प्रशासनाने अशा दुर्घटना टाळण्यासाठी ताबडतोब रेल्वे पुलाची दुरूस्ती युद्धपातळीवर करायला हवी.
रेल्वे प्रशासनाने बल्लारपूर रेल्वे पुलाचे दुरूस्तीकरण केले असते ही दुर्घटना टळता आली असती.कारण रेल्वे पुलाची ही पहीलीच घटना नाही.अनेक घटना सरकारच्या व रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे व चुकांमुळे झालेल्या आहेत.29 सप्टेंबर 2017 मुंबईतील प्रभादेवी स्टेशनवर एकाचवेळी चार रेल्वे आल्याने अरूंद ब्रिजवर एकाचवेळी गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी होऊन 23 जण ठार तर 39 जण जखमी झाले होते.3 जुलै 2018 ला मुसळधार पावसामुळे अंधेरी स्टेशनवरील पुलाचा काही भाग कोसळल्याने 5 जण जखमी झाले होते.14 मार्च 2019 संध्याकाळी गर्दीच्या वेळी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ (सीएसएमटी) फुट ओव्हर ब्रिज कोसळल्याने 6 जण ठार तर 38 जण गंभीर जखमी झाले होते.अशा भयावह घटना डोळ्यासमोर असुनही बल्लारपूर रेल्वे पुलाची पुनरावृत्ती झाली हीबाब रेल्वे प्रशासनाच्या दृष्टीकोनातून अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब आहे.
ह्या घटना फक्त महाराष्ट्रातील आहे यापुर्वी देशात अशा कितीतरी घटना झाल्या असाव्यात. रेल्वेपुलाच्या कोणत्याही छोट्या घटना मोठे रूप धारण करू शकतात.त्यामुळे रेल्वे प्रशासनाने कोणत्याही घटनेची वेळीच दखल घेतली पाहिजे.तेव्हाच रेल्वे पुलाच्या दुर्घटना किंवा इतर कोणत्याही दुर्घटना टळता येईल.त्याचप्रमाणे रेल्वे पुलाच्या महाराष्ट्रासह देशात झालेल्या दुर्घटना लक्षात घेता.रेल्वे प्रशासनाने,राज्य सरकारने व केंद्र सरकारने कोणत्याही प्रकारचा विलंब न करता रेल्वे पुलाची दुरूस्ती ताबडतोब करावी.