‘द एम् फिटनेस अँड मार्शल आर्ट अकॅडमीचा’ ४ वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न
गुणवंत कांबळे
मुंबई प्रतिनिधी
मो.नं.९८६९८६०५३०
मुंबई- सायन कोळीवाडा २९ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी सात वाजता तक्षशिला बुध्द विहार येथे आयोजक द एम् फिटनेस अँड मार्शल आर्ट अकॅडमी चे अध्यक्ष मास्टर विशाल रमेश कदम अध्यक्ष आणि संस्थापक/ ब्लॅक बेल्ट 5 वा डॅन,
भारतरत्न अटल राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार-2019,अभिमान महाराष्ट्र –
महाराष्ट्र राज्य पुरस्कार – 2021
सदर या कार्यक्रमाची जबाबदारी म्हणून विद्यार्थी व सहकारी गौरव शिर्के,सानवी गौडा,पृथ्वीराज कदम,
प्रिन्स कांबळे यांनी सहभाग दिला आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये चौथा ‘वर्धापन दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमांचे प्रमूख पाहूणे मास्टर आकाश किशोर शिंदे – रॉयल स्पोर्ट, आणि एलिट स्पोर्ट असोसिएशन चे अध्यक्ष आणि संस्थापक /ब्लॅक बेल्ट 8 वा डॅन भारतरत्न अटल राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार – 2018,राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार – दिल्ली – 2019,जीवनगौरव राष्ट्रीय अचिव्हमेंट पुरस्कार – 2019,मेजर ध्यानचंद
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार – 2021,
अभिमान महाराष्ट्र –
महाराष्ट्र राज्य पुरस्कार – 2021
विजय पगारे- भाजपा उमेदवार वॉर्ड क्रमांक १७३ प्रतीक्षा नगर महाराष्ट्र सचिव भाजाप युवा,सुबोध सकपाळ – अध्यक्ष-आदर्श सामाजिक प्रतिष्ठान, तक्षशिला बुद्ध विहार आदी. मान्यवरांची उपस्थिती होती.
तसेच ह्या कार्यक्रमामध्ये रॉयल स्पॉटचे विद्यार्थी यांची आणि कराटे शिकणाऱ्या विद्यार्थीचे पालक व स्थानिक लोकांनी ही बहुसंख्येने उपस्थिती दर्शवली होती.