स्पॉटलाईट: वाढते रस्ते अपघात चिंताजनक

52

स्पॉटलाईट: वाढते रस्ते अपघात चिंताजनक               

रमेश लांजेवार

मो: 992169077

राज्यात रस्ते अपघातांची संख्या व त्यामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या ही अत्यंत गंभीर बाब आहे.राज्यात दिवसेंदिवस रस्ते अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येते ही अत्यंत दुखदायी बाब आहे.रोडचे खड्डे, रोडचे बांधकाम यामुळे सर्वसामान्यांना आवागमन करण्यास मोठी अडचण निर्माण होते.त्याचप्रमाणे रोडचे काम सुरू असताना वनवे ट्राफीक असते अशाच ठिकाणी अपघाताचे प्रमाण जास्त दिसून येते.

दिनांक 29 नोव्हेंबर रोज मंगळवारला नागपूर जिल्ह्यातील हिंगणा रोडवरील वानाडोंगरी परिसरात एक अपघात झाला यात दोघे भाऊ कामावर जात असतांना एका टिप्परने धडक दिली व दोघांही भावांचा जागीच मृत्यू झाला.त्याचप्रमाणे दिनांक 29 नोव्हेंबर रोज मंगळवारला नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथील खापा या गावी दोघे मोटारसायकलने जात असतांना टिप्परने धडक दिली व एकाचा जागीच मृत्यू झाला व दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.अशाप्रकारे नागपूर जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढल्याचे दिसून येते.याकडे सरकारने व प्रशासनाने जातीने लक्ष देण्याची गरज आहे.असे अपघात होने हा अत्यंत चिंतेचा व गंभीर विषय आहे.कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या कामानिमित्त किंवा नौकरीवर जात असतो.परंतु वाढते रोडचे अपघात पहाता  प्रत्येकामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होने सहाजिकच आहे.यावरून स्पष्ट होते की घरून निघालेला व्यक्ती वापस घरी सुखरूप पोहचेलच याची काहीही गॅरंटी नाही ही बाब सध्याच्या होणाऱ्या अपघातावरून लक्षात येते.कोणताही अपघात असो यात एकालाच दोष देता येणार नाही.

वाहन चालकांनी आपल्या वाहनांवर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे असते.त्याचप्रमाणे घरून निघताना हेल्मेट घालुनच निघायला हवे.कारण कोणताही अपघात सांगुन येत नाही.त्यामुळे या धकाधकीच्या जीवनात स्वतःचा जीव स्वतःलाच सांभाळायचा आहे.वाहन चालवितांना दुचाकी असो अथवा चारचाकी असो आपल्या वाहणाच्या वेगावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.त्याचप्रमाणे सरकारने व वाहतूक प्रशासनाने दुर्घनांच्या ठिकाणी जातीने लक्ष देण्याची गरज आहे.रोडचे अपघात रोखण्यासाठी सरकार, प्रशासना व नागरिक यांच्यात समन्वय असणे अत्यंत गरजेचे आहे.त्याचप्रमाणे वाहतुकीच्या बाबतीत सरकारने किंवा वाहतूक प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे तीतकेच गरजेचे आहे.कारण “जान है तो जहान है” हा मुलमंत्र सर्वांनीच अंगीकारला पाहिजे.परंतु राज्यातील अनेक भागात टिप्पर,ट्रक चालकांच्या व इतर वाहनचालक यांच्या निष्काळजीपणामुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.यावर वाहतूक प्रशासनाने कठोर पाऊल उचलण्याची नितांत गरज आहे.

सध्या नागपूरला 19 डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होणार आहे.यासाठी करोडो रुपयांचा अवाजवी खर्च करून डेटिंग -पेंटिंग सुरू आहे.परंतु वाढते रोडचे अपघात याकडे सरकार, राजकीय पुढारी व प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. राज्यातील अनेक महामार्ग मृत्यूचे महामार्ग बनल्याचे दिसून येते.याचे जिवंत उदाहरण म्हणजे नागपूरातील चिचभुवन येथून जाणारा राष्ट्रीय महामार्ग हा आता मृत्यूचा महामार्ग झाल्याचे दिसून येते.कारण या महामार्गावरील अतिभरधाव वाहने दिसली की येथील रहिवास्यांना थरकाप सुटतो.चिंचभुवन चौकात आतापर्यंत अनेक अपघात झाले असून त्यातील मृतांची संख्या मोठी आहे.येथील रहीवाशांना नागपूरकडे येण्यासाठी जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो.हीच परिस्थितीत अनेक महामार्गावर आपल्याला पहायला मिळते.

अपघातांचे उदाहरण द्यायचे झाले तर सरकारी आकड्यानुसार भंडारा जिल्ह्यात जानेवारी 2022 ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत एकुण 426 अपघात झालेत या अपघातात 154 लोकांचा मृत्यू झाला व 216 गंभीर जखमी झालेत आणि इतर किरकोळ जखमी झाले असे अहवालात म्हटले आहे.अशी अपघातांची भयावह परिस्थितीत एकट्या भंडारा जिल्ह्याची आहे तर महाराष्ट्रातील 36 जिल्ह्याची काय गंभीर परिस्थिती असेल हे आपण समजू शकतो.म्हणजेच अपघातांची वाढती संख्या अत्यंत चिंताजनक व धोकादायक स्थितीत असल्याचे दिसून येते.त्यामुळे वाढते अपघात रोखण्यासाठी नागरिकांनी सामोरं येण्याची गरज आहे.याकरिता आपण सर्वांनी सर्वप्रथम वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे.वाहन चालवितांना मुख्यत्वे करून मोबाईलचा वापर करूच नये.त्याचप्रमाणे आपल्या वाहनांचे हॉर्न, ब्रेक,इंडीगेटर सदैव व्यवस्थीत(ओके)असायला हवे व यांचा योग्यवेळे वापर व्हायलाच हवा जेनेकरून अपघात रोखण्यास मोठी मदत होईल आणि वाहन चालवितांना नेहमीच सतर्कता बाळगली पाहिजे.

सरकाने अधिवेशन आहे म्हणून स्वतःच्या सुविधेसाठी रोडचे खड्डे न बुजवीता नागरिकांना होणारा त्रास पाहून व वाढते अपघात पाहून रोडचे खड्डे बुजवले पाहिजे व वाढते अपघात टाळण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न व्हायला हवेत.