जोगेश्वरीत दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

78

जोगेश्वरीत दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

जोगेश्वरीत दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

पूनम पाटगावे
जोगेश्वरी मुंबई प्रतिनिधी
मो. नं. ८१४९७३४३८५

जोगेश्वरी :- दहावी व बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा जोगेश्वरी पूर्व येथील शिवसेना शाखा क्रंमांक ७८ चे शाखाप्रमुख नितीश म्हात्रे यांनी आयोजित केला.
आमदार व माजी राज्यमंत्री श्री. रवींद्र वायकर आणि शिवसेना उपनेते व युवासेनेचे सरचिटणीस अमोल कीर्तिकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दहावी आणि बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शाखेच्या वतीने भेटवस्तू देऊन गुणगौरव करण्यात आला. या विद्यार्थ्यांना आमदार वायकर यांनी पुढील काळात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून यशस्वी व्हावे, असा आशीर्वाद देऊन शुभेच्छा दिल्या आणि शिवसेनेच्या वतीने लवकरच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याकरिता विशेष कार्यक्रम घेण्यात येईल, असेही आमदार वायकर यांनी सांगितले. शिवसेना उपनेते श्री. अमोल कीर्तिकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. आणि बारावी पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी आपले वय वर्ष अठरा पूर्ण झाल्यावर मतदार यादीत नाव नोंदवावे आणि राष्ट्र निर्माण करण्याच्या प्रक्रियेत आपला मतदानाचा हक्क बजवावा असेही तरुण पिढीला आवाहन केले. याप्रसंगी आमदार श्री. रवींद्र वायकर, श्री. अमोल कीर्तिकर यांच्यासह पदाधिकारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.