कशेडी घाटात कार दरीत कोसळली ! चालक गंभीर जखमी ५ किरकोळ जखमी

59

कशेडी घाटात कार दरीत कोसळली ! चालक गंभीर जखमी ५ किरकोळ जखमी

सचिन पवार 

रायगड ब्युरो चीफ

मो: 8080092301

रायगड :- मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटा त मुंबई बाजू कडून खेड दिशेने जाणारी कार चालकाचे नियंत्रण सुटून कार दरीत कोसळली असल्याची घटना मंगळवार ६ डिसेंबर रोजी सकाळी ८.१५ वाजताच्या सुमारास धामणदेवी गाव हद्दीत घडली आहे.

  याबाबत सविस्तर हकीगत अशी की मुंबई गोवा महामार्ग क्रमांक ६६ धामणदेवी दत्तवाडी तालुका पोलादपूर या ठिकाणी घाटकोपर ते पळचील जाणारी ईरटीका कार क्रमांक एम एच 03-बी जे -0671 वरील चालक सतीश जगताप वय-३५ वर्ष रा.संभाजीनगर कुर्ला मुंबई यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या डाव्या बाजूस रस्ता सोडून खाली उतरून दरीमध्ये पलटी होऊन अपघात झालेला आहे.

 या अपघातात कारमधून प्रवास करणारे वाहन चालका सह ७ इसम प्रवास करीत होते .

यामध्ये चालक सतीश जगताप वय -३५ वर्ष यांना गंभीर जखम. झाली आहे तर दिपाली कर्नाले वय ६५, दामोदर कर्नाले वय ७०, साक्षी कर्नाले वय ४२, स्वराज कर्नाले वय१२, राजेश कर्णाले ३८ वरील एक ते पाच यांना किरकोळ दुखापत झालेली असून या सर्वांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय पोलादपूर येथे औषधा उपचार करता दाखल करण्यात आले आहे. अपघातात वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

    या अपघाताची माहिती समजतात कशेडी महामार्गाचे पोलीस उपनिरीक्षक अनिल चांदणे, सहाय्यक फौजदार यशवंत बोडकर यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले. या अपघाताची नोंद पोलादपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.