श्री शंकरराव बेेझलवार महाविद्यालय अहेरी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा 66वा महापरिनिर्वानदिन संपन्न
मारोती कांबळे
गडचिरोली जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
मो.नं.9405720593
अहेरी: स्थानिक श्री शंकरराव बेझलवार कला वाणिज्य महाविद्यालयात 6 डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 66 वा महापरिनिर्वाण दिन संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. आंबेडकर विचारधारा विभागाकडून करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. नागसेन मेश्राम सर होते. सुरुवातीलाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. विचार मंचावर प्रमुख वक्ते इंग्लिश विभाग प्रमुख डॉ. रवींद्र हजारे सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठी विभाग प्रमुख प्रा. गजानन डी. जंगमवार सर आणि एम.सी.वी.सी. विभाग प्रमुख प्रा. दीपक उत्तरवार सर होते. मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब यांच्या जीवनावर प्रकाश टाकून विद्यार्थ्यांना यथोचित मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. आंबेडकर विचारधारा विभाग प्रमुख प्रा. प्रभाकर घोडेस्वार सर यांनी केली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुहास मेश्राम सर यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. रुपा घोणमोडे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाला प्रा. गौरव तेलंग सर, प्रा. नामदेव पेंदाम सर, प्रा. मंगला बनसोड मॅडम, प्रा. ज्ञानदीप आवारी, प्रा. मेश्राम मॅडम तसेच आदी शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्या विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.