बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतन महाविद्यालयात स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन

50

बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतन महाविद्यालयात स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन

अश्विन गोडबोले

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी

मो: 8830857351

चंद्रपूर, 5 डिसेंबर: राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतन, चंद्रपूर आणि चंद्रपूर शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 2 डिसेंबर शुक्रवारला दुपारी ३.३० वाजता बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतन चंद्रपूर येथे परिसर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. दुपारी ३.३० वाजता या कार्यक्रमाची सुरवात झाली त्यात, बजाज तंत्रनिकेतन चे प्राचार्य एस. ई. ठोंबरे यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व समजावून सांगितले.

यांनतर सर्वांनी मिळून बजाज तंत्रनिकेतन तसेच कॉलेजच्या आजुबाजूचा परिसर स्वच्छ केला. बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतनच्या प्रांगणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मालखेडे यांनी केले.

राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी स्वच्छता अभियानावर एक निबंध स्पर्धा घेण्यात आली, यात विजेता ठरलेल्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतन चे प्राचार्य एस. ई ठोंबरे, सर्व विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक व इतर शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यानी अभियानांत सहभाग घेतला.