जिल्हाधिकारी कार्यालयात
संत संताजी जगनाडे महाराज यांना अभिवादन
✍मनोज एल खोब्रागडे✍
सह संपादक मीडिया वार्ता न्युज
मोबाईल नंबर : 9860020016
भंडारा : – संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त आज दिनांक 8 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश पाटील, उपजिल्हाधिकारी (सा.मा.) आकाश अवतारे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.