महाराष्ट्र राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निषेधार्थ बांधिलकी संघटनेच्या वतीने दादर येथे निदर्शने

53

गुणवंत कांबळे, मुंबई प्रतिनिधी
मो.नं.९८६९८६०५३०

मुंबई दि. १०/११/२०२२. महाराष्ट्र राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्रालाच नव्हे तर अखंड भारत देशाला वंदनीय असणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य केले आहे. या महापुरुषांनी लोकांकडे भीक मागून शाळा काढल्या असे अत्यंत निंदनीय असे वक्तव्य पाटील यांनी केले आहे.मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज दिनांक : १०/१२/२०२२ रोजी सायंकाळी ५.०० वाजता दादर रेल्वे स्टेशन (पु), प्लॅटफॉर्म क्रमांक ६ च्या बाजूला, बांधिलकी सामाजिक संघटना व भारतीय लोकसत्ताक संघटना यांच्या वतीने निदर्शने करण्यात आली.

त्यांच्या या कृत्याने तमाम पुरोगामी, परिवर्तनवादी व या महापुरुषांना आपला आदर्श मानणाऱ्या लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. अशा भावना निदर्शकांनी व्यक्त केल्या.
या निदर्शनास उपस्थित सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावंत, मुलनिवासी माला, कमलाकर शिंदे,अमोलकुमार बोधिराज, दिपिका आंग्रे, जया बनसोडे, रुपेश पुरळकर, प्रदिप शिंदे, सिद्धार्थ उघाडे, भिमरत्न माला इ. कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला.