चंदनखेडी वन जि.गडचिरोली येथील रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतमजूर महिलेला बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांचा मदतीचा हात
✍मनोज एल खोब्रागडे✍
सह संपादक मीडिया वार्ता न्युज
मोबाईल नंबर :-9860020016
गडचिरोली : – चामोर्शी तालुक्यातील चंदनखेडी वन येथे कापूस तोडणीसाठी गेलेल्या शेतमजूर महिला सुमन सुभाष सोयाम वय 38 वर्ष हिला 11डिसेंबर रविवारी सकाळच्या सुमारास रान डुकराने गंभीर जखमी केले.ही बाब बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांना कळताच त्यांनी त्वरित वाहन घेऊन शेतात गेले आणि जखमी महिलेला आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तसेच वनविभागाला याची माहिती देऊन त्वरित पंचनामा करुन मदत मिळवून देण्याचे निर्देश दिले.
यावेळी बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांच्या समवेत मार्कडा कंसोबा तेथील ग्रामपंचायत सदस्य नंदूभाऊ सिडाम, चंदनखेडी तेथील परदेशीभाऊ सिडाम उपस्थित होते. राकेश भाऊ यांची नेहमीच संकटकाळी गोरगरीब लोकांच्या मदतीला धाऊन जाणारा हक्काचा माणूस अशी ख्याती आहे. यावेळी सुद्धा त्यांच्यातील माणुसकीचा परिचय घडून आला.