महापुरुषांच्या अस्मितेसाठी पुणे बंदच्या मुक मोर्चात बहुजन जनता दलाचा सहभाग – पंडितभाऊ दाभाडे

मीडियावार्ता

पुणे, १४ डिसेंबर: शिव शाहू फुले डॉ आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात गेले अनेक दिवस सातत्याने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी अपमानकारक वत्यव्ये करत आहेत.हे पहिल्यांदाच घडत नाही महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्त झाल्यानंतर भगतसिंग कोश्यारीची अनेकदा जिभ घसरल्याचं पाहायला मिळालं आहे याची सुरुवात भगतसिंग कोश्यारी यांनी केली आणि त्यापाठोपाठ भाजपच्या इतरही नेत्यांनी मुक्ताफळे उधळली.

यामध्ये भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी . भाजपचे आमदार प्रसाद लाड.भाजप नेते व आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यात छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करण्यासाठी स्पर्धाच लागली आहे . यापूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मा.ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले सह इत्यादींवर बेजबाबदार वत्वव्य केले होते.आणि नुकतेच भाजपचे आमदार व मंत्री असलेले चंद्रकांत पाटील डॉ बाबासाहेब आंबेडकर.मा.ज्योतिबा फुले कर्मवीर भाऊराव पाटील.यांनी शाळा सुरू करण्यासाठी लोकांना भिक मागितली असे बेजबाबदार वत्वव्य केले .यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी पुणे शहर आणि जिल्ह्यातील विविध संघटनांनी एकत्र येऊन मंगळवार दि १३ डिसेंबर रोजी पुणे डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज चौकातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पुष्पहार अर्पण करून नतमस्तक होऊन अभिवादन केले यावेळी बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे . शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे कॉंग्रेस नेते रमेश बागवे मोहनदादा जोशी . राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत जगताप शिवसेना (ठाकरे गट) शहर अध्यक्ष संजय मोरे.शहर अध्यक्ष गजानन थरकुडे यांच्या सह अनेक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

   महापुरुषांच्या अस्मितेसाठी पुणे बंदच्या मुक मोर्चात सहभागी होण्यासाठी बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांनी आपल्या कार्यक्रते आणि पदाधिकारी यांच्या उपस्थित पाठींबा दिला होता या मुक मोर्चात बहुजन जनता दलाचे राजेश जानकर प्रा भाऊसाहेब शिंदे दादासाहेब तरडे छबुताई तायडे मिना खांडेकर सुनिता राऊत सुनील पाटील आनंद गजभिये महेंद्र इंगळे धनराज माने किशोर राऊत सुनील पाटील अरूण दाते दिपक कांबळे विशाल माने किशोर चौधरी शांताराम गावंडे हिम्मत पाटील रोहित लांडगे राजेश खंडारे यांच्या सह अनेक बहुजन जनता दलाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने पुणे बंदच्या मुक मोर्चात सहभागी झाले होते असे बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here