१०० दिव्यांगांना मिळाले कानाचे मशीन."हेल्पर्स ऑफ दी हॅण्डीकॅप" या संस्थेचा उपक्रम. भाजपाचे नेते नील सोमय्या व किरीट सोमय्या यांनी १०० कर्णबधीर लोकांना दिल्या शंभर कानाच्या मशीनस्.

१०० दिव्यांगांना मिळाले कानाचे मशीन.”हेल्पर्स ऑफ दी हॅण्डीकॅप” या संस्थेचा उपक्रम.

भाजपाचे नेते नील सोमय्या व किरीट सोमय्या यांनी १०० कर्णबधीर लोकांना दिल्या शंभर कानाच्या मशीनस्.

१०० दिव्यांगांना मिळाले कानाचे मशीन."हेल्पर्स ऑफ दी हॅण्डीकॅप" या संस्थेचा उपक्रम. भाजपाचे नेते नील सोमय्या व किरीट सोमय्या यांनी १०० कर्णबधीर लोकांना दिल्या शंभर कानाच्या मशीनस्.

✍सचिन पवार ✍
रायगड ब्युरो चीफ
📞8080092301📞

रोहा :-रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील दिव्यांगांना प्रेरणा मिळावी म्हणून ” हेल्पर्स ऑफ दी हॅण्डीकॅप ” या संस्थेतर्फे दिव्यांगांना कानाचे मशीन वितरित करण्याचे आयोजन रोहा शासकीय विश्राम गृहात करण्यात आले होते.

रोह्यात अपंग पुनर्वसन संस्थेचे काम करणाऱ्या रोशन अमोल देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यानी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यावेळी १०० दिव्यांगांना कानाचे मशीन उपलब्ध करून देण्यात आले.अपंग पुनर्वसन संस्थेच्या रोशन अमोल देशमुख यांच्या प्रयत्नांतुन ” हेल्पर्स ऑफ दी हॅण्डीकॅप” , ” युवक प्रतिष्ठाण आणि लायन्स क्लबच्या ” सहभागातून या सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी भाजपाचे नेते नील सोमय्या व किरीट सोमय्या यांनी १०० कर्णबधीर लोकांना शंभर कानाच्या मशीन दिल्या. या कार्यक्रमात ज्या दिव्यांगांनी परिस्थितीवर मात करत शिक्षण, कला व सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी केली अश्या दिव्यांगांचे सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.यावेळी रोहा बाळासाहेबांची शिवसेना तालुका प्रमुख ॲड.मनोजकुमार शिंदे, मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, रोहा सिटीझन फोरमचे निमंत्रक प्रदीप आप्पा देशमुख, भाजपा शहर अध्यक्ष शैलेश रावकर, लायन्स क्लबचे मिलन शाह, शशिकांत मोरे, रोशन अमोल देशमुख, प्रशांत देशमुख, अमोल देशमुख, समिधा अष्टीवकर आदींसह रायगड जिल्ह्यातील दिव्यांग सदस्य उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here