जिल्ह्यात एकाच दिवसात मूल व सावली तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात दोन व्यक्ती ठार •सावली तालुक्यातील रुद्रापूर येथील घटना •मूल तालुक्यातील कांतापेठ येथील घटना •एकाच आठवड्यातील तिसरी घटना

जिल्ह्यात एकाच दिवसात मूल व सावली तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात दोन व्यक्ती ठार

•सावली तालुक्यातील रुद्रापूर येथील घटना
•मूल तालुक्यातील कांतापेठ येथील घटना
•एकाच आठवड्यातील तिसरी घटना

जिल्ह्यात एकाच दिवसात मूल व सावली तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात दोन व्यक्ती ठार •सावली तालुक्यातील रुद्रापूर येथील घटना •मूल तालुक्यातील कांतापेठ येथील घटना •एकाच आठवड्यातील तिसरी घटना

🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
8830857351

सावली / मूल : 14 डिसेंबर
सकाळी गावाबाहेर गेलेल्या व्यक्तीला वाघाने ठार करून 800 मीटरपर्यंत ओढत नेल्याची घटना 13, डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास चकपिरंजी बीट क्रमांक 397 अंतर्गत येत असलेल्या रुद्रापूर येथे घडली. बाबुराव बुधाजी कांबळे (60, रा. रुद्रापूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. वाघाने ठार केल्याची एकाच आठवड्यातील ही दुसरी घटना असल्याने तालुक्यातील नागरिक भयभित झाले आहेत. अश्यातच सावली तालुका हा जंगलव्याप्त तालुका ओळखला जातो. तालुक्यातील अनेक गावे ही जंगलालगत असल्याने हिंस्त्र पशूंचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रुद्रापूर येथील मृतक बाबुराव कांबळे हे गावालगत असलेल्या जिल्हा परिषद शाळेजवळील उसेगावकडे जाणार्‍या रस्त्यावर शौचास बसले होते. शेतात दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला करून ठार केले. त्यानंतर घटनास्थळापासून जवळपास 800 मीटरपर्यंत फरफटत नेले. ही बाब लक्षात येताच गावकरी आरडाओरड करीत वाघाच्या मागे धाव घेतली. गावकर्‍याच्या आवाजाने वाघाने बोरकुटे यांचा मृतदेह शेतालगतच सोडून पळ काढला. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला व उत्तरिय तपासणीकरिता मृतदेह सावली ग्रामीण रुग्णालयात पाठविला. घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबावर आघात झालेला आहे. मृतकाच्या पश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे. वनविभागाकडून म्रुतकाच्या कुटुंबास 25 हजार रुपयांचे तात्काळ मदत देण्यात आली. घटनेचा पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी विरुडकर यांच्या मार्गदर्शनात वनरक्षक चौधरी, शेंडे, गायकवाड, आखाडे, मुंडे करीत आहेत.
तालुक्यातील अनेक गावे जंगलालगत असल्याने परिसरात वन्य प्राण्यांचा मुक्तसंचार आहे. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी सावली या ठिकाणी शिक्षणासाठी पायदळ वा सायकलद्वारे येतात. मात्र परिसरात वाघाचा धुमाकुळ सुरू असल्याने शाळेत जायचे कसे या विवंचनेत विद्यार्थी व पालक आहे. वेळीच वन्यप्राण्यांचा बंदोबस्त न झाल्यास शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ येणार की काय, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. जिल्ह्यालाच वनमंत्री पद लाभले असल्याने वनमंत्र्यांनी वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली जात आहे.
अश्यातच तिसरी घटना गावालगतच्या जंगलात शेळ्या चारत असताना वाघाने हल्ला करून मूल तालुक्यातील कांतापेठ येथील गुराखी देवराव लहानु सोपनकर (55) याला ठार केले. ही घटना बुधवार, 14 डिसेंबरला सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. देवराव सोपनकर नेहमीप्रमाणे गावालगतच्या जंगलात शेळ्या चारावयास गेले होते. सायंकाळी झाल्यानंतर शेळ्या घरी परत आल्या. परंतु, देवराव मात्र घरी परतले नाही. वडील परत न आल्याने त्यांच्या मुलाने ग्रामस्थांच्या सहकार्याने जंगलात शोध घेतला असता तेव्हा गावापासून अंदाजे 4 किलोमीटर अंतरावर चिरोली नियतक्षेत्र क्रमाक 720 मध्ये देवरावचा मृतदेह आढळून आला. मृतावस्थेतील देवरावचे शरीर आणि परिस्थितीची पाहणी केली असता देवराववर वाघाने हल्ला करून दिड किलोमीटर लांब फरफटत नेऊन ठार केल्याचे लक्षात आले. मृतकाच्या पश्चात पत्नी आणि दोन मूले आहेत. या घटनेची माहिती वनविभागाच्या स्थानिक अधिकार्‍यांना दिली. माहिती कळताच चिचपल्ली वनपरीक्षेत्र अधिकारी प्रियंका वेलमे आणि पोलिस अधिकारी सहकार्‍यांसह घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, परिसरात वाघांचा वावर वाढला असल्याने शेतकरी आणि नागरिकांना दहशतीमध्ये आहे. या घटनेच्या दोन महीन्यायापूर्वीसुध्दा कांतापेठ परीसरात शेतात काम करणार्‍या एका महिलेवर वाघाने हल्ला करून तिचा बळी घेतला होता. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये वनविभागाविरूध्द संताप व्यक्त करण्यात येत आहे. हल्लेखोर वाघांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी कांतापेठवासीयांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here