चंद्रपुरात ६८ व्या विदर्भ साहित्य संमेलनास थाटात आरंभ… •साहित्यिकांनी नव्या आयुधांचा वापर करून सकस साहित्य युवा पिढीपर्यंत पोहचवले पाहिजे, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार . •त्यामुळे साहित्याची पुस्तके अंगी लागतात – स्वागताध्यक्ष डॉ. वि. स. जोग

52

चंद्रपुरात ६८ व्या विदर्भ साहित्य संमेलनास थाटात आरंभ…

•साहित्यिकांनी नव्या आयुधांचा वापर करून सकस साहित्य युवा पिढीपर्यंत पोहचवले पाहिजे, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार .

•त्यामुळे साहित्याची पुस्तके अंगी लागतात – स्वागताध्यक्ष डॉ. वि. स. जोग

चंद्रपुरात ६८ व्या विदर्भ साहित्य संमेलनास थाटात आरंभ... •साहित्यिकांनी नव्या आयुधांचा वापर करून सकस साहित्य युवा पिढीपर्यंत पोहचवले पाहिजे, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार . •त्यामुळे साहित्याची पुस्तके अंगी लागतात - स्वागताध्यक्ष डॉ. वि. स. जोग

🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
8830857351

चंद्रपूर : 16 डिसेंबर
चंद्रपूरभूषण शांताराम पोटदुखे साहित्य परिसर, चंद्रपूर – साहित्य आनंद देणारे, चिंतन करायला लावणारे, समाज जोडणारे, पीडितांची शुश्रूषा करणारे आणि प्रगतीचा मार्ग दाखवणारे असावे. हे खरे आहे की, पुस्तक वाचणार्‍यांची आणि त्यातही विकत घेऊन वाचणार्‍यांची संख्या कमी आहे. पण साहित्यिकांनी खचून न जाता नव्या आयुधांचा वापर करून सकस साहित्य युवा पिढीपर्यंत पोहचवले पाहिजे, अशी अपेक्षा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे बोलतांना व्यक्त केली. विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने चंद्रपूरातील अग्रणी शिक्षण संस्था सर्वोदय शिक्षण मंडळ, गोंडवाना विद्यापीठ व सुर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ६८ व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रख्यात विचारवंत आणि लेखक डॉ. वि. स. जोग हे होते. यावेळी माजी आमदार सुदर्शन निमकर, प्र.-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, ज्येष्ठ विधीज्ञ डॉ. फिरदौस मिर्झा, ज्येष्ठ विचारवंत डॉ. वेदप्रकाश मिश्रा, आ. अभिजीत वंजारी, संमेलनाचे स्वागताध्यक्ष गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, संमेलनाध्यक्ष डॉ. वि. स. जोग, संमेलनाचे संरक्षक तथा सर्वोदय शिक्षण मंडळाचे सचिव प्रशांत पोटदुखे, संमेलनाचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. पी.एम. काटकर, संमेलनाचे कार्यवाह इरफान शेख कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन, विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष रवींद्र शोभणे, संजय वैद्य, सरचिटणीस विलास मानेकर, सत्कारमूर्ती डॉ. शरद सालफळे, बंडू धोतरे, डॉ. अशोक जीवतोडे प्रामुख्याने उपस्थित होते. सदर संमेलन विदर्भ साहित्य संघाचे दिवंगत अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांना समर्पित आहे. यावेळी बोलतांना मुनगंटीवार पुढे म्हणाले की, चंद्रपूरचे वातावरण उष्ण आहे. मात्र, जे सुलाखून निघते तेच सोने असते. या संमेलनातील चिंतनातून निघणारे विचारही सोन्यासारखेच असतील. वातावरणातील प्रदुषण रोखण्यासाठी नियंत्रण मंडळ आहे. पण मानसिक प्रदुषण कोण राखेल, तर त्यासाठी साहित्य आहे. विदर्भ या देशाच्या हृदयस्थानी आहे आणि म्हणून चांगले व उन्नत विचार प्रसृत करण्याची जबाबदारीही विदर्भ साहित्य संघाची आहे. साहित्याच्या या पालखीला खांदा देण्यासाठी चंद्रपूरकर सदैव तत्पर आहेत, असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. आपल्या अध्यक्षीय भाषणातून बोलताना संमेलनाध्यक्ष डॉ. वि. स. जोग म्हणाले की, भ्रमणध्वनीतून मिळणारे ज्ञान म्हणजे घाईघाईने जेवण. पुस्तकांपासून मिळणारे ज्ञान म्हणजे सावकाश. एकेक घास ३२ वेळा चावून जेवणे. त्यामुळे साहित्याची पुस्तके अंगी लागतात. मग ते पुस्तके स्वतंत्र असो की, संपादित असोत असे सांगितले.
साहित्याच्या दृष्टीने आजचा काळ अनेक आव्हानांचा आहे. वाचन संस्कृती लोक पावत आहे, हे त्यातील एक आव्हान भ्रमणध्वनीच्या अतिरेकामुळे किंवा तारतम्य शून्य वापरामुळे असे घडते आहे. विनोबांनी ज्ञानविज्ञान, आत्मज्ञान हे साहित्याचे घटक सांगितले. व्हाट्सअप, गुगल, फेसबुक यातून ज्ञान मिळेल, आत्मज्ञान मात्र मिळणार नाही असेही डॉ. वि. स. जोग यांनी नमूद केले. संमेलनाचे स्वागताध्यक्ष कुलगुरू डॉ. बोकारे यावेळी बोलतांना म्हणाले की, विदर्भातील साहित्यिकांचे योगदान निश्चितच मोठे आहे. विदर्भातील साहित्यिकांनी सदैव उत्कृष्ट व दर्जात्मक साहित्य दिले आहे असे सांगत आगामी काळात नवे साहित्यिक मराठी साहित्याला गतवैभव निर्माण करून देतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संमेलनाचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर यांनी केले. डॉ. शोभणे यांनी संमेलनाच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. यावेळी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी प्राचार्य मदनराव धनकर यांचा सत्कार करण्यात आला. तो त्यांची कन्या डॉ. पद्मरेखा धनकर यांनी मान्यवराच्या हस्ते स्वीकारला. वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी ज्येष्ठ शल्य चिकित्सक डॉ. शरदचंद्र सालफळे, शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्यासाठी प्राचार्य डॉ. अशोक जिवतोडे तर पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी इको-प्रो चे बंडू धोतरे यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन संचालन डॉ. रमा गोळवलकर-पोटदुखे यांनी, तर आभारप्रदर्शन इरफान शेख यांनी केले. यावेळी माजी कुलगुरू डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, वि. सा. संघाचे केंद्रीय सदस्य डॉ. श्याम मोहरकर यांच्यासह साहित्यप्रेमी, प्राध्यापक, मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.