हिंगणघाट येते मेस्टाची सभा संपन्न

क्षेत्रातील इंग्रजी माध्यमाच्या शाळतील विविध समस्यांवर विषयावर झाली चर्चा.

मुकेश चौधरी प्रतीनिधी
हिंगणघाट:- हिंगणघाट-समुद्रपुर तालूक्यातील महाराष्ट्र राज्य इंग्लीश मिडीयम स्कूल ट्रस्टज असोसियशनच्या सभासदांची सभा यशोमगल येथे नुकतीच संपन झाली.

सभेत विविध विषयांवर गहन चर्चा झाली. कोविड 19 मुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थीतीमुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळे समोर उभे राहीलेले आर्थिक संकट, RTE 25% परतावा थक बाकी, पालकाना शाळेच्या समस्याशी निगडीत धरुन त्यांच्या पाल्यांची बाकी शैक्षणिक शुल्क भरण्यात प्रोत्साहीत करणे. इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे विध्यार्थी भविष्य घडवीण्यात असलेले अन्नसाधारण महत्व, विद्यार्थ्यांचे ऑनलाइन आफलाईन शिक्षण त्याबाबत पालक व शिक्षकांना येणा-या समस्या, शाळेचा दैनिक व मासिक खर्च भागविण्यास तसेच वेतन व कर्जहप्ते ई. बाबत निर्माण झालेली भीषण स्थिती यावर सविस्तर चर्चा झाली.

सभेचा अध्यक्षस्थानी गिरधर राठी होते. त्यांनी सभेसमोर इंग्रजी माध्यमाच्या शाळे समोर असलेली आजची आर्थिक स्थिती वीषद केली. RTE 25% परताव्या करिता होणा-या विलंबास व प्रस्ताव सादर करण्यास होणा-या त्रास बदल नाराजी व्यक्त केली. सभेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणुन रमेशराव धारकर यांनी पालकांना आपल्या शाळेच्या विविध समस्यांची जाणिव करुन देणे गरजेचे असल्याचे सांगितले.

या सभेत मिलिंद दिक्षीत, संदीप सरोदे, स्यमुअल सर, योगेश खोडे, प्रफुल खोडे, येन्नवर मैडम, अम्बुलकर मैडम, पाल मैडम, मडावी मैडम तसेच मुख्याधापकांच्या वतीने यादव सर, फुलझले सर, यांनी आपले विचार व्यक्त केले. सभेचे संचालन जयंत भोयर यांनी केले. तर आभार चौधरी सर यांनी मानले. या सभेत मेस्टाचा विदर्भ महिला अध्यक्ष हेमलता कोसुरकर यांनी प्रमुक उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here