शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ संत राम सिंग यांची आत्महत्या.

52

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ संत राम सिंग यांची आत्महत्या.

दिल्ली:- केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याविरुद्ध दिल्लीच्या सीमांवर गेल्या 20 दिवसांपासून शेतकरी ठाण मांडून बसले आहेत. शेतकरी कायदा मागे घेण्याच्या मागणीवर अडून बसलेले असताना एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ संत राम सिंग वय 65 यांनी आत्महत्या केली आहे. मृत्यूपूर्वी त्यांनी पंजाबी भाषेत सुसाईड नोटही लिहिली असून शेतकरी आंदोलन हे अत्याचाराविरुद्ध आवाज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

संत राम सिंग हे करनाल जिल्ह्यातील सिंघरा गावचे रहिवासी होते. शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येनंतर एक सुसाईड नोट सापडली असून यात त्यांनी ‘हा अत्याचाराविरुद्धचा बुलंद आवाज’, असल्याचे नमूद केपे आहे.

दरम्यान, शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ संत राम सिंग यांनी आत्महत्या केल्याने देशभरातून हळहळ व्यक्त होत आहे. दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंध कमिटीचे अध्यक्ष मनजिंदर सिंग सिरसा यांनीही या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. तसेच समर्थकांना संयम राखण्याचे आवाहन केले.

कोंडली बॉर्डरवर आंदोलनादरम्यान केली आत्महत्या

दरम्यान, संत राम सिंग शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. कोंडली बॉर्डरवर आंदोलन करताना त्यांनी आत्महत्या केली. त्यांना पानिपत येथील पार्क रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले.