आंबेधानोरा (ता. पोंभुर्णा) येथे भव्‍य नेत्र चिकीत्‍सा शिबीराचे आयोजन, श्री माता कन्‍यका सेवा संस्‍थेचा उपक्रम

अश्विन गोडबोले 

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी

मो:8830857351

३० डिसेंबर, पोंभूर्णा : आपल्‍या सुंदर डोळ्यांनी हे सुंदर जग बघता यावे, याकरिता डोळयांची निगा राखणे आपले कर्तव्‍य असते. चंद्रपूर जिल्‍हा हा आदिवासी बहुल व ग्रामीण प्रमाण अधिक असलेला आहे. ग्रामीण भागातील गोरगरीब नागरिकांना मोफतमध्‍ये नेत्र चिकीत्‍सा शिबीराच्‍यामाध्‍यमातुन डोळयांची तपासणी करता यावी याकरिता राज्‍याचे वने, सांस्‍कृतीक कार्य, मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या मार्गदर्शनाखाली सातत्‍याने श्री माता कन्‍यका सेवा संस्‍था, चंद्रपूर आरोग्‍य शिबीरांचे आयोजन करून रूग्‍णसेवेचे व्रत कायम जोपासत आहे. याकरिता शनिवार ३१ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता ग्राम पंचायत भवन आंबेधानोरा (ता. पोंभुर्णा) येथे भव्‍य नेत्र चिकीत्‍सा शिबीराचे आयो‍जन करण्‍यात आले आहे.

चंद्रपूर जिल्‍हयामध्‍ये ग्रामीण तसेच शहरी भागातील गोरगरीब नागरिकांना आरोग्‍य सेवा उपलब्‍ध करून देण्‍याकरिता श्री माता कन्‍यका सेवा संस्‍था, चंद्रपूरच्‍या वतीने सातत्‍याने आरोग्‍य शिबीरांचे आयोजन करण्‍यात येत आहे. गरीब नागरिकांना महागडी रूग्‍णसेवा उपलब्‍ध होत नसते किंवा ती महागडी असल्‍याने गोरगरीब नागरिक या आरोग्‍यसेवेपासून वंचित असते. ही बाब हेरून पालकमंत्री मुनगंटीवार यांच्‍या मार्गदर्शनाखाली कायमच आरोग्‍य शिबीरांचे आयोजन करण्‍यात येत आहे.

सदर शिबीराला कस्‍तुरबा हॉस्‍पीटल सेवाग्राम वर्धा येथील तज्ञ डॉक्‍टरांच्‍या माध्‍यमातुन नेत्र तपासणी करण्‍यात येणार आहे, अशी माहिती संस्‍थेचे सचिव राजेश्‍वर सुरावार व शैलेंद्रसिंह बैस यांनी दिली असून उक्‍त शिबीराचा लाभ परिसरातील नागरिकांनी घ्‍यावा असे आवाहन केले आहे. या शिबीराला येताना राशन कार्ड व आधार कार्ड सोबत घेवून यावे, अशी विनंती सुध्‍दा करण्‍यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here