अखेर वर्षाखेरीस सापडला हरवलेला जॅकल

पूनम पाटगावे

मुंबई प्रतिनिधी

मो. नं. – ८१४९७३४३८५

मुंबई :- वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजे ३१ डिसेंबर २०२२ हा दिवस वर्षांखेर आणि नवीन वर्षाचे स्वागत जल्लोष्यात करण्यासाठी प्रत्येकजण सज्ज होता. जिथे प्रत्येकजण नवीन वर्षाची तयारी करत होता मात्र WWA वाइल्डलाईफ वेलफेअर असोसिएशनच्या EDR टीमने उल्लेखनीय कामगिरी बजावत आपले कर्तव्य दर्शविले.

        एक भारतीय गोल्डन जॅकल चेंबूरच्या जंगल परिसरातून भटकला होता. ३१ डिसेंबर २०२२ च्या दुपारी २.३० ते ३ च्या दरम्यान तो जॅकल डायमंड पार्क परिसरातील एका निवासी इमारतीत आश्रय घेण्यासाठी आला. सदर भागातील स्थानिक नागरिक या प्राण्याला ओळखण्यात गोंधळले कारण हा प्राणी पूर्णपणे वाढलेला नर जॅकल होता ज्याचा आकार निरोगी रस्त्यावरील कुत्र्यासारखा दिसत होता. निवासी स्थानिकांनी या प्राण्याची माहिती WWA च्या EDR टीम ला दिली. आणि EDR टीमनेदेखील ३० मिनिटांच्या आत कॉल ला प्रतिसाद दिला. परिस्थितीचे विश्लेषण करून टीमने प्राण्याला यशस्वीरित्या पकडण्यासाठी सुटकेचे सर्व मार्ग ब्लॉक करण्यासाठी परिसरात जाळे टाकून बचाव कार्य पार पाडले.

          रेस्क्यू टीमकडून प्राण्याला वैद्यकीय तपासणीसाठी पशुवैद्यकाकडे नेण्यात आले. वैद्यकीय तपासणीत त्याच्या पायाला दुखापत झाल्याचे आढळून आले. प्राण्याला डॉ. दीपा कात्याल यांच्या देखरेखीखाली ठेवून आवश्यक ती वैद्यकीय मदत देण्यात आली. आणि प्राणी आता WWA च्या ताब्यात आहे. त्याचे निरीक्षण आणि काळजी घेतल्यानंतर तो तंदुरुस्त असल्याचे घोषित केल्यानंतर त्याला पुन्हा जंगलात सोडले जाईल.

       या गोल्डन जातीच्या जॅकल च्या बचाव कार्यादरम्यान मानद वन्यजीव वॉर्डन श्री.रोहित मोहिते, आरएफओ मॅनग्रोव्हज सेल श्री. वरक आणि संपूर्ण वनविभाग टीमनेदेखील बचावकार्यात समन्वय साधला त्याबद्दल ईडीआर प्रमुख वन्यजीव कल्याण संघ श्री. राज जाधव यांनी विशेष आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here