एस एस निकम इंग्लिश स्कूल इंदापूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

सचिन पवार 

रायगड ब्युरो चीफ

मो: 8080092301

 रायगड :-माणगांव तालुक्यातील इंदापूर येथील एस एस निकम इंग्लिश स्कूल मध्ये स्त्रियांसाठी साक्षरतेची वाट प्रकाशमान करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९२ वी जयंती मंगळवार दिनांक ३ जानेवारी रोजी एस. एस. निकम इंग्लिश स्कूल इंदापूर येथे उत्साहात साजरी करण्यात आली.

 विविध उपक्रमांसह स्त्री शक्तीचा आवाज आणखी बुलंद करण्याचा संकल्प सोडत क्रांतीज्योतीला अभिवादन करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ रंजीता जाधव मॅडम यांच्या हस्ते सावित्रीबाईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.स्पेशल डे विभागाच्या प्रमुख सौ. नीलम जाधव मॅडम यांनी सावित्रीबाईंच्या जीवन कार्याविषयी माहिती तसेच मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे ज्युनिअर के.जी मधील विद्यार्थी कुमारी.स्वस्ती देवेंद्र साबळे या विद्यार्थिनीने सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केली होती.

या कार्यक्रमासाठी शाळेच्या पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ संपदा पाटील मॅडम, सौ.प्रीती जाधव मॅडम तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,नर्सरी ते इयत्ता दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते .शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला व हा कार्यक्रम उत्साहात व आनंदाच्या वातावरणात पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here