निवेदिता सोसायटीच्या निवडणुकीत महिला प्रगती पॅनेल विजयी

49

निवेदिता सोसायटीच्या निवडणुकीत महिला प्रगती पॅनेल विजयी

अश्विन गोडबोले

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी 

मो: 8830857351

चंद्रपूर, ६जानेवारी: निवेदिता महिला क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी नवरगावची २० वर्षांनंतर पहिल्यांदाच अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत महिला प्रगती पॅनेल या गटाने सर्व १२ ही जागांवर विजय संपादित केला आहे.

मागील २० वर्षांमध्ये निवडणूक न घेता सामंजस्याने कार्यकारी मंडळ तयार केले जात होते. परंतु, २० वर्षांनंतर पहिल्यांदांच निवडणूक झाली. महिला प्रगती पॅनेल व महिला विकास परिवर्तन पॅनेल अशा दोन गटांमध्ये संस्थेची निवडणूक गुरुवारी झाली व सायंकाळीच निकाल जाहीर झाला.

त्यामध्ये महिला विकास पॅनेलचे उमेदवार सुनंदा सुरेश बाकरे, सुरेखा प्रकाश खोब्रागडे, पूजा किशोर कोरेवार, ताराबाई अरविंद राऊत, अनुराधा विनोद बोरकर, रत्नाताई विजय प्यारमवार, अंजली राकेश बल्लेवार, वैशाली संजय बोडणे, नंदा राजकुमार गभणे, वर्षा दिनकर गायकवाड, प्रज्ञा दीपक कवासे, मंजुषा चंद्रशेखर बिरेवार असे सर्वजण विजयी झाले.

निकाल घोषित होताच नागरिकांनी फटाके फोडून व एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा केला.