तुपगावात गृहप्रकल्पाचे सांडपाणी शेतकऱ्यांच्या शेतात सोडले.पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान.

तुपगावात गृहप्रकल्पाचे सांडपाणी शेतकऱ्यांच्या शेतात सोडले.पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान.

✍सचिन पवार ✍
रायगड ब्युरो चीफ
📞8080092301📞

पेण :-रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील चौक तुपगाव ग्रामपंचायत हद्दीत सुरू असलेल्या गृहप्रकल्पामुळे सुरेश गोविंद गुरव या शेतकऱ्याची जमीन नापीक झाली असून शेती वाचवण्यासाठी गुरव यांनी शासनाकडे धाव घेतली आहे.

गुरव पिढ्यानपिढ्या शेती करत असून त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. खरीप आणि रब्बी अशी दोन्ही पिके एक एकर शेतामध्ये दरवर्षी घेतात.परंतु यंदा शेतीलगत सुरू असलेल्या गृहप्रकल्पाचा फटका गुरव यांना बसला आहे. गृहप्रकल्पासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याचा निचरा थेट गुरव यांच्या शेतात होत आहे. त्यामुळे यंदाचे भात पीक वाया गेले.याबाबत शेतकरी गुरव यांनी मंडल अधिकारी चौक किरण पाटील यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज करून भरपाई मिळावी यासाठी मागणी केली.

मंडल अधिकाऱ्यांनी देखील पंचनामा केला आहे. यानंतर देखील दहा दिवसाचा कालावधी उलटून सुद्धा अद्याप काही कारवाई न झाल्यामुळे गुरव हताश झाले आहेत. एकीकडे तालुक्यातील शेती आणि शेतकरी हाताच्या बोटावर मोजण्याएवढा शिल्लक राहिला असताना धनाढ्य बिल्डरमुळे उरले सुरलेली शेती देखील नष्ट होणार आहे. त्यामुळे शासनाने ठोस कारवाई करावी अशी मागणी होत असून शासनाने याची तातडीने गंभीर दखल घेणे आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here