सुधा सितारा शिष्यवृत्ती ” वितरणाच्या कार्यक्रमात २०२२ व २०२३ करिता विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती वाटप.

50

सुधा सितारा शिष्यवृत्ती ” वितरणाच्या कार्यक्रमात २०२२ व २०२३ करिता विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती वाटप.

सुधा सितारा शिष्यवृत्ती " वितरणाच्या कार्यक्रमात २०२२ व २०२३ करिता विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती वाटप.

✍सचिन पवार ✍
रायगड ब्युरो चीफ
📞8080092301📞

रोहा :-रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात शुक्रवार दिनांक १३ जानेवारी रोजी सुदर्शन कंपनी कॉलनी कम्युनिकेशन हॉल येथे माजी पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या मुख्य उपस्थितीत सुदर्शन सी एस आर फाउंडेशनच्या माध्यमातून ” सुधा सितारा शिष्यवृत्ती वितरणाच्या ” कार्यक्रमात २०२२ व २०२३ करिता विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती वाटप करण्यात आली.

रोहा तालुक्यातील वेगवेगळ्या शाळेतील गरीब, गरजू व होतकरू विद्यार्थिनींना त्यांच्या शालेय फी, शालेय पुस्तके, वह्या, इत्यादी अनेक गरजांसाठी अनेक वेळा अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे अनेक पालकांना आपल्या पाल्यांचे शिक्षण योग्यरीत्या पूर्ण करता येत नाही.अश्या वेगवेगळ्या शाळेतील गरीब व हुशार विद्यार्थिनींना आर्थिक मदत मिळण्यासाठी व त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी मदत मिळावी या साठी सुदर्शन सी एस आर फाउंडेशनच्या माध्यमातून ” सुधा सितारा शिष्यवृत्ती ” देण्यात आली आहे.

सुदर्शन सी एस आर फाउंडेशनच्या माध्यमातून
तालुक्यातील वेगवेगळ्या शाळेतील विद्यार्थिनींच्या परीक्षा घेत त्यातील योग्य व हुशार विद्यार्थिनींना आर्थिक मदत देण्यासाठी प्रयत्न केले आहेत.या शिष्यवृत्ती मुळे शेकडो विद्यार्थिनींना त्यांच्या शिक्षणाचा लाभ घेता येणार असून त्यामुळे त्या विद्यार्थिनींना त्यांचे करिअर व त्यांचे भवितव्य उज्वल करण्यास मदत मिळणार आहे.या वितरण कार्यक्रमास आलेल्या मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी विविध मान्यवरांची भाषणे सुद्धा झाली व आलेल्या सर्व विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती व प्रमाणपत्र देण्यात आली.

यावेळी माजी पालकमंत्री आदित तटकरे यांनी सांगितले की ” स्पर्धा परीक्षा अजून आपल्याला यश प्राप्त झाले नाही, परंतु यापुढे रोहयातूनच पहिला आयपीएस अधिकारी व्हावी अशी माझी इच्छा आहे.”यावेळी मेहेंदळे हायस्कूल मुख्याध्यापक, रोहा एम बी मोरे हायस्कूल, मुख्याध्यापक व तटकरे हायस्कूल प्राध्यापक यांना रोख रकमेचे धनादेश व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.