रोहा तालुक्यात कुणबी जोडो अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

46

रोहा तालुक्यात कुणबी जोडो अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

रोहा तालुक्यात कुणबी जोडो अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

✍सचिन पवार ✍
रायगड ब्युरो चीफ
📞8080092301📞

रोहा :-कुणबी राजा जागा हो समाजाचा धागा हो कुणबी समाजाला एकजूट करण्यासाठी कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी,रायगड,पालघर,ठाणे,आणि उपनगर मुबंई आशा सात जिल्ह्यात कुणबी समाजोन्नती संघ मुबंई यांच्या विशेष सहकार्यातून तसेच संघाचे अध्यक्ष भूषण बरे ,व अशोक वालम यांच्या संकल्पनेतुन कुणबी जोडो अभियान राबविले जात असून या अभियानाला कोकणात उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभत आहे.
तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी पाठोपाठ रायगड मध्ये कुणबी जोडो अभियान रथ पोलादपूर, महाड,माणगाव,म्हसळा ,तळा तद्नंतर शुक्रवारी रोहा तालुक्यात कुणबी समाज बांधवांनी कोलाड येथे जोरदार या अभियानात सहभागी होत स्वागत केले .
यावेळी संघाचे अध्यक्ष भूषण बरे,कुणबी चेंबर्स ऑफ कॉमर्स तसेच कुणबी राजकीय संघटन समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या कुणबी जोडो अभियानात हरिश्चंद्र पाटील,कार्यध्यक्ष कृष्णा कोबनाक,ज्ञानदेव पवार,सदानंद काष्ठे,अशोक करंजे, शंकरराव म्हसकर,सुरेश मगर,शिवराम शिंदे,रामचंद्र सपकाळ,मारुती खांडेकर,शिवराम महाबळे,सुरेशदादा महाबळे,शंकरराव भगत,रामचंद्र चितळकर, संदेश लोखंडे,खेळू ढमाल,विष्णू लोखंडे,प्रो.माधव आग्री,डॉ सागर सानप,डॉ मंगेश सानप,अनंत थिटे,चंद्रकांत लोखंडे आदी परिसरातील खांब, सुतारवाडी,कोलाड, नागोठणे,धाटाव, सोनगाव,घोसाळे,चनेरा या विभागातील कुणबी समाज बांधवांनी कोलाड आंबेवाडी नाक्यावर कुणबी जोडो रथ अभियानाचे स्वागत केले.