पोलादपूर तहसिल कार्यालयासमोरील दिविल ग्रा.पं. संदर्भातील उपोषणाची आ. प्रवीण दरेकर यांच्या मध्यस्थीने यशस्वी सांगता.उपोषणकर्ते नलावडे यांची रायगड जिल्हाधिकारी यांच्याशी घडविली चर्चा.

50

पोलादपूर तहसिल कार्यालयासमोरील दिविल ग्रा.पं. संदर्भातील उपोषणाची आ. प्रवीण दरेकर यांच्या मध्यस्थीने यशस्वी सांगता.उपोषणकर्ते नलावडे यांची रायगड जिल्हाधिकारी यांच्याशी घडविली चर्चा.

पोलादपूर तहसिल कार्यालयासमोरील दिविल ग्रा.पं. संदर्भातील उपोषणाची आ. प्रवीण दरेकर यांच्या मध्यस्थीने यशस्वी सांगता.उपोषणकर्ते नलावडे यांची रायगड जिल्हाधिकारी यांच्याशी घडविली चर्चा.

✍सचिन पवार ✍
रायगड ब्युरो चीफ
📞8080092301📞

पोलादपूर :-रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील दिविल ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान जाहिर झालेला निकाल परस्पर बदलण्याच्या मनमानी कृतीविरोधात उमेदवारांचे प्रतिनिधी विश्वास नलावडे यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी पोलादपूरचे भुमिपुत्र विधानपरिषद सदस्य आमदार प्रवीण दरेकर यांनी यशस्वी मध्यस्थी करीत उपोषणाची सांगता घडविली.

यावेळी आमदार दरेकर यांनी रायगड जिल्हाधिकारी तथा कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांच्यासोबत उपोषणकर्ते विश्वास नलावडे यांनी मोबाईलवरून चर्चा घडवित उपोषणकर्त्यांच्या मागण्या तीन दिवसांमध्ये मान्य करण्यासंदर्भात अनुकूलता मिळविली आहे.

आमदार प्रवीण दरेकर यांनी उपोषणकर्ते विश्वास नलावडे यांनी पोलादपूर तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत भाजपा तालुका अध्यक्ष प्रसन्ना पालांडे, शहर अध्यक्ष राजाभाऊ दिक्षित, महाड अध्यक्ष जयवंत दळवी इत्यादी अन्य कार्यकर्त्यांसमवेत पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक युवराज म्हसकर, संदीप शिरगांवकर, नाईक, नटे आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून उपोषणस्थळी सहकार्याची भुमिका घेतली.

यावेळी आ. दरेकर यांनी पोलादपूर तहसिल कार्यालयाविरोधातील कार्यकर्त्यांच्या संतप्त भावना जाणून घेतल्या दिविल ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील मतमोजणीवेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी २० डिसेंबरला दिलेला निकाल २३ डिसेंबरला बदलण्यात येऊन भाजपा उमेदवारांवर अन्याय करीत अन्य दोन उमेदवार विजयी झाल्याचे रायगड जिल्हाधिकारी यांच्यामार्फत जाहिर करताना जिल्हाधिकारी कार्यालयाची दिशाभूल करण्यात आल्याचे, यावेळी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी तालुकाध्यक्ष प्रसन्ना पालांडे यांच्या उपस्थितीत सांगितले.आ.प्रवीण दरेकर यांनी यावेळी रायगड जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्यासोबत मोबाईलवरून थेट संपर्क साधून स्वत: दिविल ग्रामपंचायत निवडणुकीची पार्श्वभूमी सांगून निवडणूक निर्णय अधिकारी तसेच निर्णय बदणारे तहसिल कार्यालयामधील कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली.रायगड जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी संबंधित दोषींवर तीन दिवसांमध्ये कारवाई करण्याची ग्वाही यावेळी उपोषणकर्ते विश्वास नलावडे यांना दिली.आ. प्रवीण दरेकर यांनी यानंतर उपोषणकर्ते विश्वास नलावडे यांना फ्रुट ज्यूसचा ग्लास देऊन उपोषणाची यशस्वी सांगता केली.

यावेळी डॉ.राजेश सलागरे व अन्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांच्या तब्येतीची वेळोवेळी तपासणी करून तसे अहवाल वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. भाग्यरेखा पाटील यांना अवलोकनार्थ सादर केले.उपोषणाच्या तीनही दिवसांमध्ये पोलादपूर तहसिलदार तसेच कोणीही संबंधित अधिकारी उपोषणस्थळी आले नसल्याबद्दल उपोषणस्थळी तीव्र संताप व्यक्त झाला.