सायन ‘लोकसत्ताक स्टडी सेंटर’ येथे ‘राजमाता जिजाऊ’ व ‘फातिमा शेख’ यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी
गुणवंत कांबळे मुंबई प्रतिनिधी
मो. नं.९८६९८६०५३०
……….……………..……………….
राजमाता जिजाऊ व फातिमा शेख यांचा जीवन संघर्ष तसेच आजच्या आधुनिक काळातील स्त्री व तरुण पिढी…
………….……………………………..
मुंबई- न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या मूल्यांचे स्वराज्य घडवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बालमनावर संस्कार करणाऱ्या शिवरायांना युद्ध कौशल्यात पारंगत करणाऱ्या राजमाता जिजाऊ तसेच सावित्रीमाई फुले यांच्या सहकारी ,पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख यांची जयंती लोकसत्ताक स्टडी सेंटर सायन येथे भारतीय लोकसत्ताक विद्यार्थी संघ आणि भारतीय लोकसत्ताक महिला संघ याच्या वतीने मोठ्या उत्साहात संयुक्त जयंती साजरी करण्यात आली.
सदर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून ऍड. मा.रूपाली खळे मॅडम तसेच मार्गदर्शक म्हणून ऍड. मा. अमोलकुमार बोधिराज सर हे उपस्थित होते.
या कार्यक्रमास उपस्थित मार्गदर्शक ऍड.मा.अमोलकुमार बोधिराज सर यांनी आजचे तरुण पिढी व त्यांची कर्तव्य यावर वक्तव्य केले त्याचबरोबर भारतीय लोकसत्ताक विद्यार्थी संघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. मनीष जाधव सर व उपाअध्यक्ष मा. प्रेमसागर बागडे सर यांनी राजमातांना वंदन केले राजमाता जिजाऊ व फातिमा अभिषेक यांच्या जीवनातील संघर्ष यावर व्यक्तव्य केले . त्याचबरोबर बेरोजगार संघाच्या सचिव मा. वैशाली कदम मॅडम यांनी आजची स्त्री या विषयावर स्त्रियांच्या समस्या व त्यासाठी करावे लागणारे उपाययोजना यावर आपले मत व्यक्त केले. त्याचबरोबर भारतीय लोकसत्ताक संघटनाचे उपाध्यक्ष मा.संतोष(सनी) कांबळे सर ,भारतीय लोकसत्ताक संघटना मुंबई उपाध्यक्ष मा. नितीन सातपुते सर यांनी सुद्धा राजमाता जिजाऊ व फातिमा शेख यांना वंदन केले .
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्ष ऍड. मा. रूपाली खळे मॅडम यांनी आजच्या स्री साठी संविधान मार्फत मिळालेले हक्क अधिकार आणि राजकीय ठिकाणी आरक्षित जागा या विषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन मा. अश्विनी पवडमन मॅडम यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मा. अंकिता मोरे मॅडम यांनी करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .
कार्यक्रमाचे फोटो शूट मा. मंगेश खरात सर यांनी केले तसेच व्यवस्थापन मा.योगेश कांबळे सर यांनी केले होते.
सदर कार्यक्रमास उपस्थित भारतीय लोकसत्ताक संघटनेचे पदाधिकारी तेसेच विद्यार्थी संघाचे व महिला संघ यांचे पदाधिकारी कार्यकर्ते, सभासद उपस्थित होते .