युवकांनी जीवनात स्वामी विवेकानंद यांचा आदर्श ठेवल्यास जीवनास योग्य दिशा मिळेल. -डॉ. प्रकाश लाभसेटवार

45

युवकांनी जीवनात स्वामी विवेकानंद यांचा आदर्श ठेवल्यास जीवनास योग्य दिशा मिळेल.
-डॉ. प्रकाश लाभसेटवार

युवकांनी जीवनात स्वामी विवेकानंद यांचा आदर्श ठेवल्यास जीवनास योग्य दिशा मिळेल. -डॉ. प्रकाश लाभसेटवार

मारोती कांबळे
मिडिया वार्ता न्युज
गडचिरोली जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
मो.न.9405720593

अहेरी- स्थानिक श्री. शंकरराव बेझलवार कला व वाणिज्य महाविद्यालयात ‘स्वामी विवेकानंद जयंती’ ‘राष्ट्रीय युवक दिन’ व ‘मासाहेब जिजाऊ जयंती’ यांच्या एकत्रित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना त्यांनी हे विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे आयोजन माहिती व ग्रंथालय विभागाच्या वतीने करण्यात आले होते. स्वामीजींचे जीवन कार्य उलगडून यावर सखोल विचार महाविद्यालयाचे प्रा. गौरव तेलंग यांनी मांडले. मासाहेब जिजाऊ यांचे जीवनदर्शन व भारतीय संस्कृती या विषयावर व्याख्यान प्रा. रूपा घोणमोडे यांनी दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्रा. डॉ. नागसेन मेश्राम उपस्थित होते. प्रमुख उपस्थिती डॉ. रवींद्र हजारे यांची होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुहास मेश्राम यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा. अमोल शंभरकर यांनी केले.
कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्रा. गौरकर सर, प्रा. जंगमवार सर, प्रा. उत्तरवार सर, प्रा. लांडे सर, प्रा. पेंदाम सर तसेच शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.