मित्राने मित्राची रिव्हॉल्व्हरने दोन गोळ्या झाडून केलि हत्या
त्रिशा राऊत हिंगणा ग्रामीण प्रतिनिधी …… मो 9096817953
नागपूर (हिंगणा) येथील श्रीकृष्णनगरात पत्नीबाबत वादग्रस्त बोलल्याबद्दल झालेल्या वादातून मित्राने मित्राची रिव्हॉल्व्हरने दोन गोळ्या झाडून हत्या केली. रविवारी रात्री १० च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे हिंगणा परिसर हादरला आहे.
मृताचे नाव अविनाश अशोक घुमडे (वय ३२, पंचवटी पार्क, हिंगणा) आहे. तर आरोपीचे नाव दीपक घनचक्कर उर्फ खट्या (वय३८, श्रीकृष्णनगर, हिंगणा) दीपकची पत्नी शिवानी दीपक घनचक्कर व ३ ते ४ साथीदार हे सहआरोपी आहेत. दीपक घनचक्कर व अविनाश घुमडे हे दोघेही काही वर्षांपासून मित्र होते. मानकापूर भागात अनेक शत्रू निर्माण झाल्याने आरोपी दीपकच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. त्यामुळे त्याला अविनाशने हिंगण्यात आणून आश्रय दिला. तेव्हापासून त्यांच्यात घट्ट मैत्री झाली. अविनाश हा आरोपी दीपक व त्याच्या काही मित्रांसोबत नेहमीच राहात होता.
हिंगणा परिसरात काही वादविवाद झाला तर अविनाश त्याला मदत करायचा. घटनेच्या काही दिवसांपूर्वी अविनाश हा आरोपी दीपकच्या पत्नीच्या चरित्र्यावरून काही विवादास्पद बोलला होता. यावरून दीपकने श्रीकृष्णनगर येथील घरी जाऊन पत्नीला विचारणा केली. नंतर अविनाशला याबाबत विचारणा करण्यासाठी आरोपी दीपकने रविवारी (ता. ८) पत्नीबाबत वादग्रस्त बोलल्याने गोळ्या झाडून मित्राची हत्या घरी बोलावले. अविनाश हा त्याच्यासोबत याच भागात राहणारा मित्र वंश ढगे (१८)याला सोबत घेऊन आरोपी दीपकच्या घरी पोहचला. तिथे दीपकची पत्नी व काही मित्र आधीच उपस्थित होते. अविनाश तिथे गेल्यावर शिवानीसमोरच तिच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून वाद सुरू झाला.
हिंगणा परिसरात काही वादविवाद झाला तर अविनाश त्याला मदत करायचा. घटनेच्या काही दिवसांपूर्वी अविनाश हा आरोपी दीपकच्या पत्नीच्या चरित्र्यावरून काही विवादास्पद बोलला होता. यावरून दीपकने श्रीकृष्णनगर येथील घरी जाऊन पत्नीला विचारणा केली.नंतर अविनाशला याबाबत विचारणा करण्यासाठी आरोपी दीपकने रविवारी (ता. ८) पत्नीबाबत वादग्रस्त बोलल्याने गोळ्या झाडून मित्राची हत्या घरी बोलावले. अविनाश हा त्याच्यासोबत याच भागात राहणारा मित्र वंश ढगे (१८)याला सोबत घेऊन आरोपी दीपकच्या घरी पोहचला. तिथे दीपकची पत्नी व काही मित्र आधीच उपस्थित होते. अविनाश तिथे गेल्यावर शिवानीसमोरच तिच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून वाद सुरू झाला.वाद आणखी वाढू लागला. आरोपीची पत्नी शिवानी ही अविनाशवर चिडली. यातच आरोपी दीपकने घरी ठेवले असलेले पिस्तूल अविनाशवर ताणले. यामुळे वंश ढगे घाबरून तेथून पळाला. दीपकने दोन गोळ्या झाडल्या. या दोन्ही गोळ्या छातीत घुसल्याने अविनाश जागीच कोसळला. त्यानंतर आरोपींनी त्याचा साथीदार व घटनेचा साक्षीदार वंशलाही शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र घराबाहेर अंधाराचा फायदा घेत तो पळाला होता.
यानंतर दीपक व इतर सहकाऱ्यांनी तेथून पळ काढला. इकडे वंश कसाबसा जीव वाचावत पोलिस ठाण्यात पोहोचला. तिथे रात्रपाळीत असलेले सहायक पोलिस निरीक्षक गजानन तेलरांधे यांना सर्व घटना सांगितली. पोलिसांना आधी त्याच्यावर विश्वास बसला नाही. ते लगेच वंशला घेऊन घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत आरोपी पळाले होते. आरोपीच्या खोलीचे दार उघडून पोलिस आतमध्ये गेले. तिथे अविनाश रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्याला तत्काळ हिंगणा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने त्याला नागपुरात मेडिकलमध्ये नेण्याचे ठरले. मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला.या घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त अमितेशकुमार, सहआयुक्त अश्वती दोरजे, उपायुक्त अनुराग जैन, ठाणेदार विशाल काळे घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून आरोपींच्या शोधात पथक रवाना करण्यात आले. मृत अविनाशचे वडील अशोक घुमडे यांच्या फिर्यादीवरून हिंगणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.