राजा ढाले यांच्या जन्मदिनानिमित्त परिसंवादाचं आयोजन; दिग्गज विचारवंताची दिसणार मांदियाळी

65

राजा ढाले यांच्या जन्मदिनानिमित्त परिसंवादाचं आयोजन; दिग्गज विचारवंताची दिसणार मांदियाळी

राजा ढाले यांच्या जन्मदिनानिमित्त परिसंवादाचं आयोजन; दिग्गज विचारवंताची दिसणार मांदियाळी

विशाल गांगुर्डे

मुंबई :दलित पँथरचे संस्थापक, आंबेडकरी विचारवंत, लोकप्रिय नेते दिवगंत राजा ढाले यांच्या जन्मदिनानिमित्त मुंबईत एका परिसंवादाचं आयोजन करण्यात आले आहे. मुंबईत १७ जानेवारी रोजी राजा ढाले विचार प्रवर्तन समितीकडून या कार्यक्रमाचे आयोजन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मंत्रालाय परिसर मुंबई येथे करण्यात आले आहे.

मुंबईतील राजा ढाले विचार प्रवर्तन समितीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी डॉ. इंदिरा आठवले असणार आहेत. तर माजी खासदार, माजी मंत्री हुसेन दलवाई व जेष्ठ आंबेडकरी विचारवंत, साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. हा कार्यक्रम १७ जानेवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास सुरू होणार आहे. या कार्यक्रमात उपस्थित राहण्याची विनंती समितीकडून नागरिकांना करण्यात आली आहे.

कोण होते राजा ढाले ?

कालकथित राजा ढाले हे दलित पँथरचे संस्थापक अध्यक्ष होते. लेखणी आणि निर्भीड आंबेडकरी विचारांमुळे ते लोकांचे प्रिय झाले. राजा ढाले यांनी सत्तरच्या काळात आंबेडकरी चळवळीला नवी उमेद दिली. तर ढाले यांनी १९९९ आणि २००४ साली लोकसभा निवडणूक लढवली. मात्र, त्या निवडणुकीत ढाले यांचा विजय झाला नाही. लढाऊ राजा ढाले यांचं १६ जुलै २०१९ रोजी निधन झालं.