प्रेमी युगुलाचा आत्महत्येचा प्रयत्न, तरुणीचा मृत्यू

पुणे:- पुण्यात कुटुंबीयांकडून प्रेमसंबंधाला विरोध होण्याच्या भीतीने प्रेमीयुगुलाने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये तरुणीचा मृत्यू झाला असून तरुण मात्र वाचला आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात तरूणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणीच्या वडिलांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

लिसा एका कंपनीत कामाला होती. त्याठिकाणी तिचे उमेश या तरुणासोबत प्रेम संबंध निर्माण झाले. काही महिन्यांनी रमेश नोकरी सोडून दुसरीकडे कामाला गेला होता. तरीही दोघांचे प्रेम कायम होते. परंतु घरच्यांकडून प्रेमाला विरोध होईल अशी भीती रमेशच्या मनात होती.

त्यामुळे 7 डिसेंबर रोजी दोघांनी एकत्र मिळून विषप्राशन केले. त्यानंतर त्रास होऊ लागल्यामुळे उमेशने नातेवाईकांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर नातेवाईकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन दोघांनाही ससून रुग्णालयात दाखल केले. अंगात जास्त प्रमाणात विष पसरल्याने लिसा अत्यवस्थ होती. तर तीन दिवसांच्या उपचारानंतर उमेशची तब्येत सुधारली. लिसाच्या अंगात विष जास्त पसरल्याने 14 डिसेंबरच्या रात्री तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यानंतर लिसाच्या वडिलांनी उत्तमनगर पोलीस ठाणे गाठत उमेशने मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फिर्याद दिली.

दोघांनीही नेमक्या कोणत्या कारणामुळे विष पिण्याचा निर्णय घेतला, त्यांनी विषय कुठून आणले या बाबतचा उलगडा अद्यापही झाला नाही. उमेशचा जबाब नोंदविण्यात आला नाही. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here