जय श्री प्रभु विश्वकर्माची कार्यकारणी सभा संपन्न
✍मंगेश मेस्त्री ✍
निजामपूर विभाग प्रतिनिधी
📞99238 44308📞
निजामपूर :-आज दि. २१/०१/२०२३ रोजी माणगांव तालुक्यातील इंदापुर विभाग येथील श्री विश्वकर्मा सुतार (पांचाळ) समाज भवन येथे समाज मिटींग आयोजित केली होती यावेळी या मिटींग मध्ये श्री विश्वकर्मा सुतार समाज माणगांव तालुका व रायगड जिल्हात कशा प्रकारी आपल्या बाजू मांडता येथील त्याच प्रमाणे आपला समाज एकत्रित आणता येईल व अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली व श्री विश्वकर्मा सेना रायगड जिल्हात कशी वाढवायची या विषयावर पण चर्चा करण्यात आली.
चर्चा करताना श्री विश्वकर्मा सेना चे रायगड जिल्हा प्रमुख श्री राजु मोहन रोडेकर सुतार, रायगड जिल्हा संघटक श्री मंगेश मेस्त्री व श्री विश्वकर्मा सुतार (पांचाळ) समाज भवन चे सर्व पदाधिकारी व सभासद या कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी राजु सुतार व मंगेश मेस्त्री यांनी सर्व बांधवाना आपली समस्था त्याचप्रमाणे कोणतेही कारण असो अशा अनेक चर्चा करण्यात आल्या एक मेकां साह्य करू अवघे धरू विठाई अशा शब्दाचा उल्लेख करून कार्यकारणी सभा संपन्न करण्यात आली.