माहिती घेण्याकरीता गेलेल्या पत्रकारांना तलाठ्याकडून अरे तुरे ची भाषा
तलाठी कदम यांच्यावर कारवाई न केल्यास पत्रकार प्रसाद गोरेगांवकर करणार उपोषण
✍सचिन पवार ✍
रायगड ब्युरो चीफ
📞8080092301📞
माणगांव तालुक्यात सद्यस्थितीत महामार्गाचे चौपदरीकरण सुरु आहे. नविन महामार्गाला भराव करण्यासाठी डोंगरच्या डोंगर फोडून मोठ्या प्रमाणावर मातीचे उत्खनन केले जात आहे. त्यातीलच एक आंबर्ले येथील उत्खननासाठी ४५०० ब्रासची रॉयल्टी भरण्यात आली असल्याचे महसुल खात्याकडून सांगण्यात आले होते परंतु प्रत्यक्षात रॉयल्टीच्या ३ पटीने उत्खनन करण्यात आले आहे.
याबाबत माहिती घेण्यासाठी तलाठी कार्यालय लोणेरे येथे गेलेले पत्रकार प्रसाद गोरेगांवकर व रिजवान मुकादम यांच्याशी आंबर्ले तलाठी यांनी सुरुवातीस इंग्रजी मध्ये संवाद साधत उत्खननाबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली परंतु गोरेगांवकर यांनी त्यांना त्यांच्याच इंग्रजी भाषेत उत्तरे दिल्यानंतर तलाठी कदम यांचा ताबा सुटला व त्यांनी पत्रकार प्रसाद गोरेगांवकर यांना मराठी सोड, इंग्रजी सोड, हिंदी सोड, मुद्यावर ये अशा पद्धतीत अरे तुरे ची भाषा वापरत अपमानीत केले त्यामुळे तलाठी कदम यांच्यावर कारवाई करण्यासाठी पत्रकार श्री. प्रसाद गोरेगांवकर यांनी तहसिलदार प्रियांका आहिरे यांना तक्रार अर्ज दिला असुन तलाठी श्री. कदम यांच्यावर कारवाई न केल्यास ते उपोषण करणार आहेत.