जोगेश्वरीत बाल विकास विद्या मंदिरात आपत्ती व्यवस्थापनाचे धडे
पूनम पाटगावे
जोगेश्वरी प्रतिनिधी
जोगेश्वरी :- केंद्रीय गृहमंत्रालयाकडून २१ जानेवारी २०२३ या दिवशी राष्ट्रीय स्तरावर अग्निशमन व बचावाची प्रात्यक्षिके शाळांमध्ये आयोजित करण्याचे आदेश देण्यात आले. या आदेशानुसार रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाति समाज, मुंबई संचालित बाल विकास विद्या मंदिर जोगेश्वरी (पूर्व) शाळेत मूलभूत अग्निशमन प्रशिक्षणाने अग्निरोधकांचा उपयोग करून जिवित व वित्तहानी कशी टाळावी यासाठी विद्यार्थी , पालक, शिक्षक यांच्यामध्ये आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास आपले कर्तव्य व उपाययोजना याबाबत जागृती करण्यात आली. संस्थेच्या चिटणीस सुरक्षा घोसाळकर यांनी मरोळ अग्निशमन दल वरिष्ठ स्टेशन अधिकारी अजय जाधव, फायरमन अमर म्हस्के यांना सन्मानित केले. या प्रसंगी मॕगनम फायर सर्व्हिसचे नरेंद्र साळवी व अशोक ढवळे उपस्थित होते. प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक सिध्दार्थ इंगळे, पर्यवेक्षक जगदिश सूर्यवंशी, अधिवेशन प्रमुख राजेंद्र निळे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मनाली परब, शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांचे योगदान लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका अमिता निळे यांनी केले. संस्थेचे चिटणीस यशवंत साटम यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. अनोख्या प्रात्यक्षिकां मध्ये प्रत्यक्ष सहभागी होण्याची संधी प्राप्त करून आत्मविश्वास निर्माण केल्याबद्दल शिक्षक , विद्यार्थी , पालक यांनी नागरीकांच्या सेवेत अहोरात्र तत्पर असलेल्या मुंबई अग्निशमन दला बद्दल कृतज्ञता व्यक्त केली.