खिशात लाच स्वीकारणारी महिला वाहतूक पोलीस कर्मचारी निलंबित.

पिंपरी वाहतूक नियमन करत असताना पिंपरीतील शगुन चौकात एका वाहतूक पोलिस महिलेने कारवाई न करण्यासाठी एका तरुणीकडून पैसे घेतले. याचा व्हिडीओ सोशलमीडियावर जोरदार व्हायरल झाला. याबाबत वाहतूक विभागाकडून कसुरी अहवाल सादर केल्यानंतर संबंधित वाहतूक पोलिस महिलेचे निलंबन करण्यात आले.

पिंपरी :- वाहतूक नियमन करताना एका महिला वाहतूक पोलिसाने अनोख्या पद्धतीने लाच स्वीकारली. संबंधित कर्मचारी थेट खिशात पैसे घेत असल्याची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. यावरून ‘कसुरी अहवाल’ वरिष्ठांकडे सादर करण्यात आला. त्यानंतर महिला पोलिसाचे निलंबन करण्यात आले.

स्वाती सोन्नर, असे निलंबित करण्यात आलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. सोन्नर या वाहतूक शाखेच्या पिंपरी विभागात कार्यरत आहेत. पिंपरी येथील साई चाैक येथे मंगळवारी  काही पोलीस वाहतूक नियमन करीत हाेते. त्यातील महिला वाहतूक पोलीस स्वाती सोन्नर यांनी दुचाकीवरून आलेल्या दोन महिलांना थांबविले. त्यावेळी काही जणांनी मोबाईलमध्ये याची व्हिडीओ क्लिप तयार केली.

महिला पोलीस सोन्नर यांनी दुचाकीवरून आलेल्या एका तरुणीला सूचना केली. त्यानंतर सोन्नर पाठमोऱ्या होताच संबंधित तरुणी सोन्नर यांच्या मागच्या खिशात पैसे ठेवत असल्याचे व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये दिसून येत आहे. वाहतूक पोलिसांच्या लाचखोरीच्या अनोखी शक्कलची चर्चा त्यामुळे झाली. त्यानंतर याप्रकरणी कसुरी अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त यांच्या मार्फत पोलीस उपायुक्त यांच्याकडे अहवाल सादर करण्यात आला. त्यानंतर उपायुक्त यांनी गुरुवारी सायंकाळनंतर स्वाती सोन्नर यांच्या निलंबनाचे आदेश दिले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here