पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या महाराष्ट्र हायस्कूल, लोअर परेल या शाळेमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रजासत्ताक दिनाचा सोहळा थाटात पार पडला.
मुंबई : – आजतकचे पत्रकार दीपेश त्रिपाठी हे या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते ; तसेच शाळेचे अध्यक्ष डॉ. प्रकाश पाटील व शाळा कमिटी सदस्य श्री. चंद्रकांत वाघमारे सर आदी मान्यवर देखील कार्यक्रमास उपस्थित होते.
ध्वजारोहण व राष्ट्रगीत झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या संचलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विजयी विश्व तिरंगा, हम होंगे कामयाब ही गीते व भाषणे सादर केली.
प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी सुंदर असे कवायत प्रकार , मानवी मनोरे उभारून आपल्या गुणांचे प्रदर्शन केले.
माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी ‘किशोरवयीन मुलांच्या समस्या’ या विषयावर पथनाट्य सादर केले व बहारदार अशा लेझीम सादरीकरणाने कार्यक्रमाची शोभा वाढविण्यात आली.