एकल अभियान अंचल आलापल्ली तर्फे भव्य 225 फुट तिरंगा रॅली

51

एकल अभियान अंचल आलापल्ली तर्फे भव्य 225 फुट तिरंगा रॅली

एकल अभियान अंचल आलापल्ली तर्फे भव्य 225 फुट तिरंगा रॅली

ता प्रतिनिधी/ महेश बुरमवार

आज दिनांक 26/01/2023 ला
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षा निमित्त प्रजासत्ताक दिनी अहेरी येथे एकल अभियान अंचल आलापल्ली अंचल समिती कडून भव्य असा 225 फुट लांब तिरंगा रॅली काढण्यात आली, या रॅलीत एकल अभियान अंचल आलापल्ली चे अंचल समिती, अंचल टोळी, 10 संचा चे संच प्रमुख, 279 गावातील आचार्य उपस्थित होते, तसेच अहेरी येथील बहुसंख्य नागरिक या रॅलीत सहभागी झाले.

एकल अभियान अंचल आलापल्ली तर्फे आयोजित भव्य तिरंगा रॅली चे प्रमुख आकर्षण मा. श्रीमंत राजे अंम्ब्रिशराव आत्राम महाराज माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य, तथा माजी पालकमंत्री जिल्हा गडचिरोली, मा. अवधेश्वर बाबा आत्राम,मा.रविजी नेलकुद्री अध्यक्ष अंचल समिती आलापल्ली,मा.संतोष जी मद्दीवार उपाध्यक्ष अंचल समिती आलापल्ली, मा.प्रशांत जी नामनवार ग्राम स्वराज्य प्रभारी अंचल आलापल्ली, मा.मुकेश जी नामेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य रॅली काढण्यात आली.

यानंतर एकल अभियान अंचल आलापल्ली संपूर्ण अभियानाचा अहेरी येथील रूक्मिणी मंदीर येथे भव्य कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती मा. श्रीमंत राजे अंम्ब्रिशराव आत्राम महाराज माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा माजी पालकमंत्री जिल्हा गडचिरोली, मा.अवधेश्वर बाबा आत्राम, मा.सागर जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जिल्हा प्रचारक सौ. मणी दीदी गोयंका एकल अभियान विदर्भ भाग अध्यक्ष,तथा एफ.टी.एस. चाफ्टर नागपुर महिला समिती अध्यक्ष, सौ. अनुसया दीदी अग्रवाल एफ.टी.एस. चाफ्टर नागपुर कोषाध्यक्ष, सौ. ज्योती ताई चौधरी एकल अभियान महाराष्ट्र संभाग प्रमुख ,मा. गजानन जी मेश्राम पी.8 प्रभाग बजेट प्रमुख , कु. रेणुका ताई कंचकटले भाग आरोग्य प्रमुख, मा. अनिकेत जी तोडसाम भाग कार्यालय प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रम साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी उपयुक्त मार्गदर्शन केले. एकल अभियान बद्दल विस्तृत माहिती एकल अभियानाचे वरिष्ठ कार्यकर्त्यांनी मांडले. एकल अभियाना अंतर्गत आदीवासी व वनवासी क्षेत्रात शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एकल अभियान खुप महत्वाचे कार्य करत आहे.तसेच पंचमुखी शिक्षेच्या माध्यमातून गावाचा विकास करण्यासाठी एकल अभियान मोलाचे सहकार्य करत आहे. असे मार्गदर्शन प्रमुख पाहुण्या नी केले.
एकल अभियान भाग समिती व अंचल समिती कडून एकल अभियान अंचल आलापल्ली चे सर्व कार्यकर्त्यांना व आचार्यांना यांना भेटवस्तू देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल जी गुडेलवार यांनी केले.सदर कार्यक्रमाला परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी एकल अभियान अंचल आलापल्ली चे अंचल समिती, अंचल टोळी व संच टोळी यांनी खुप परिश्रम घेतले.