पाणसई ग्राम पंचायती मध्ये 2023 देशाचा ७४वा. प्रजाकसत्ताक दिन दिमाखात साजरा.

49

पाणसई ग्राम पंचायती मध्ये 2023 देशाचा ७४वा. प्रजाकसत्ताक दिन दिमाखात साजरा.

पाणसई ग्राम पंचायती मध्ये 2023 देशाचा ७४वा. प्रजाकसत्ताक दिन दिमाखात साजरा.

✍संतोष मोरे✍
माणगांव प्रतिनिधी
7276143020

माणगांव: इंदापूर येथील पाणसई ग्राम पंचायत येथे सन:2023 देशाचा ७४ वा. प्रजासत्ताक दिन माझी सैनिक विठोबा उमाजी हर्णेकर यांच्या शुभ हस्ते, व सरपंच सौ.रुचिता राजेश धाडवे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला.
मात्र प्रजाकसत्ताक सोहळा २३ जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीने झाला आणि महात्मा गांधींच्या पुण्यतिथी पर्यंत म्हणजे(३०जानेवारी) पर्यंत चालेल. आशा प्रकारे शासनाच धोरण असल्याने दोन्ही महापुरुषांना अभिवादन करता येईल.असे मत ग्रामसेवक सदानंद वसंत राजीवडे यांनी व्यक्त केले. गेल्या वर्षी जुलै २०२२ रोजी. भारत सरकारच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अमृत सरोहर ही संकल्पना मांडण्यात आली. आणि त्याचं धर्तीवर पाणसई हद्दीतील एक जुने पुरातन तलावाकडे लक्ष वेधण्यात आले. (यशोगाथा पाणसई/ कालवण तलावाची) या विषयी मांडणी करताना पाणसई गावचे शोभनीय निसर्गरम्य ठिकाण म्हणजे पाणसई गावचे तलाव या तलावाला फार पुरातन पार्श्वभूमी आहे. तलावा पासून थोड्याच अंतरावर ग्रामस्थांचे श्रद्धास्थान म्हणजे माता सोमजाई मंदिर आहे. लगतं पुरातन शिव मंदिर आहे.या शिव मंदिरा जवळ तलावाचे विहंगम दृश्य आपल्याला पाहायला मिळते.फार पूर्वी पासून तलावातील पाणी गाई गुरांना, कपडे धुण्यासाठी व शेती इत्यादी साठी वापर होत असे. तसेच गावाच्या परंपरे प्रमाणे आज ही गणपती विसर्जन सदर तलावात होते. परंतु हे करत असताना कालांतराने तलावा मध्ये गाळ जमा झाला. व आजू बाजूला झाडी वाडू लागली.
मात्र गेल्यावर्षी जुलै २०२३ दरम्यान भारत सरकारच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त अमृत सरोहर ही संकल्पना ग्रामस्थांनी उचलून धरली ग्रामस्थांनी श्रमदान करून तलावाच्या आवती भवती झाडी होती ती श्रमदानातून कडून टाकली. ग्रामपंचायतीने ग्राम पंचायतीच्या माध्यमातून तलावातील गाळ काढण्यात आला.तसेच गणपती विसर्जनासाठी गणपती विसर्जन घाट बांधण्यात आला.ध्वजरोहना साठी ध्वज स्थंम बांधण्यात आला आहे. व तलावाच्या ठिकाणी १५ आगस्ट २६ जानेवारी या दिवशी माझी सैनिक यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात येते. भारत सरकारच्या अमृत महोत्सवी संकल्पनेमुळे ग्रामस्थांना तलावाचे वेगळे पण पाहायला मिळाले.त्यामुळे तलावाच्या सुशोभी करणामध्ये भर पडली आहे. व त्याचा फायदा ग्रामस्थांना झाला आहे. सदर ठिकाणी जेष्ठ नागरिक सकाळ संध्याकाळ फेरफटका मारतात. कोणी योगा तर कोणी व्यायाम करतात तर कोणी तलाव पाहण्यासाठी येत असतात. आणि म्हणून या अमृत सरोहरच्या निमित्ताने तलावाच्या सुंदरते मध्ये भर पडली असून तलावाचे महत्त्व वाढले आहे. व त्याचा जास्तीचा फायदा ग्रामस्थांना होत आहे. म्हणून त्याच तलावावर आज रोजी माझी सैनिक विठोबा उमाजी हर्णेकर यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. उपस्थित उपसरपंच सहदेव भिवा धाडवे, सदस्य प्रेमा मधुकर उतेकर, डॉ. कांचन राक्षे, अंगणवाडी ताई सुवर्णा नागेश शिर्के, वर्षा मोरे, संतोष शिवराम मोरे, नागेश शिर्के,शुभम हर्णेकर, ग्रामपंचायत कर्मचारी, व सिद्धार्थ नगर ग्रामस्थ उपस्थित होते.