उत्कृष्ट मतदान अधिकारी ( बिएलओ ) म्हणुन मंगेश निर्मळ यांचा जिल्हाधिकारी यांचे हस्ते सन्मान

50

उत्कृष्ट मतदान अधिकारी ( बिएलओ ) म्हणुन मंगेश निर्मळ यांचा जिल्हाधिकारी यांचे हस्ते सन्मान

उत्कृष्ट मतदान अधिकारी ( बिएलओ ) म्हणुन मंगेश निर्मळ यांचा जिल्हाधिकारी यांचे हस्ते सन्मान

✍सचिन पवार ✍
रायगड ब्युरो चीफ
📞8080092301📞

रायगड :- माणगांव मधिल मंगेश भिमरावजी निर्मळ गुरुजी यांना सन २०२२ मधिल मतदार नोंदणी-वगळणी-दुरुस्ती या संबंधित केलेल्या त्यांच्या खास कार्याची दखल घेत उत्कृष्ट मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी रायगड डाॅ. योगेश म्हसे (भाप्रसे) यांचे स्वाक्षरीने साक्षांकित केलेले प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले.

दि.२५ जानेवारी रोजी १३ वा राष्ट्रीय मतदान दिवस २०२३ चे औचित्याने माणगांव तालुक्यातील १८७ बिएलओ पैकी उत्कृष्ट बिएलओ ( मतदान अधिकारी ) म्हणुन मंगेश भिमरावजी निर्मळ यांची माणगांवच्या तहसिलदार प्रियंका आयरे यांनी त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन निवड केली. विशेष म्हणजे माणगांव १६९/६ हा त्यांचा मतदान केंद्र असुन हा जवळपास शहरी भाग असून सुद्दा त्यांनी उत्तम काम केले. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दि.२५ जानेवारी २०२३ रोजी निर्मळ यांचा अलिबाग येथिल जेएसएम काॅलेज येथे नवनिर्वाचीत जिल्हाधिकारी यांच्या शुभहस्ते यथोचित पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. जिल्ह्याचे खासदार सुनिल तटकरे यांनी देखिल निर्मळ गुरुजी यांना खास शुभेच्छा संदेश पाठवुन त्यांचे अभिनंदन केले. निर्मळ गुरुजी हे माणगांव मधिल मतदारांमध्ये सुपरिचीत आपलेसे व्यक्तिमत्व असुन त्यांचे माणगांवकरांमधुन विशेष अभिनंदन होत आहे.
उत्कृष्ठ मतदान अधिकारी ( बिएलओ ) निर्मळ गुरुजी यांचा प्रमाणपत्र पुष्पगुच्छ देऊन सन्मान करताना नवनियुक्त जिल्हाधिकारी डाॅ. योगेश म्हसे (भाप्रसे) छायाचित्रात दिसत आहेत.