रसायनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या एन आय एस एम सेबीत प्रजासत्ताक दिन उत्साहात, सुरक्षा जवानांकडून लक्षवेधी परेड व बाईंकचे स्टंट.

48

रसायनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या एन आय एस एम सेबीत प्रजासत्ताक दिन उत्साहात,

सुरक्षा जवानांकडून लक्षवेधी परेड व बाईंकचे स्टंट.

रसायनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या एन आय एस एम सेबीत प्रजासत्ताक दिन उत्साहात, सुरक्षा जवानांकडून लक्षवेधी परेड व बाईंकचे स्टंट.

✍सचिन पवार ✍
रायगड ब्युरो चीफ
📞8080092301📞

पनवेल :-रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील रसायनी येथील मोहोपाडा येथे सेबीचे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट (एन आय एस एम) येथे आज दिनांक २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण एन आय एस एम चे डायरेक्टर सि के जी नायर यांच्याहस्ते करण्यात आले.

या अगोदर परेड नेतृत्व सर्जेराव शिवाजी धामणे आणि महाराष्ट्र सुरक्षा बळाचे सुरक्षा जवान यांनी कॅरेमोनियल परेड केले.हे परेड पाहण्यासाठी रसायनी परीसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

ध्वजारोहण होताच मानवंदना देत भारतमातेची गीत आणि घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. यानंतर विशेष थीम असलेली एकवीस परमवीर चक्र प्राप्त केलेल्या जवानांना या प्रजासत्ताक दिनी भारत सरकारने अंदमान आणि निकोबार बेटाजवळील व्दिपाना परमवीर चक्र विजेत्यांची नावे दिली असल्याचे सांगण्यात आले.
यानंतर भारत मातेला व ध्वजाला सलामी देत महाराष्ट्र सुरक्षा बळाच्या सुरक्षा जवानांनी एका बाईकवर पाचजण बसून भारतमातेचे रुप साकारले व बाईंक एन आय एस एम च्या आवारात फिरविली.

यावेळी उपस्थित नागरिकांनी टाळ्यांचा गजर करीत वाहवा केली. याप्रसंगी एन आय एस एम चे डायरेक्टर सि. के. जी. नायर, रजिस्ट्रार सुनिल कदम, एस. पी. डी. जी एम लेफ्टनंट कर्नल रमेश कुमार,रविद्र प्रसाद अगस्ती आदींसह एन आय एस एम चे शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी आणि रसायनीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर कार्यक्रम एन आय एस एम चे जनरल मॅनेजर लेफ्टनंट कर्नल रमेश कुमार आणि रविद्र प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला. दरम्यान एन आय एस एम चे डायरेक्टर सि. के. जी. नायर यांनी बोलताना सांगितले की, ” आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा मोठा इतिहास आपल्यासमोर आहे. विविध धर्म, भाषा, प्रांत, संस्कृती जोपासणा-या भारतीयांना जगातील सर्वात मोठी लोकशाही असणारा आपला भारत देश आहे. आपण साजरा करीत असलेला प्रजासत्ताक दिन हा लोकशाहीचा उत्सव असून विविध प्रयत्नांमुळे आपली लोकशाही अधिकाधिक मजबूत होत आहे.'”भारत माझा देश आहे,सारे भारतीय माझे बांधव आहेत,”‘ हि सर्वेव्यापी प्रतिज्ञा आणि संविधानावर आपली सर्वांची कमालीची निष्ठा आहे.” असेही नायर यांनी बोलताना सांगितले.