जल्लोषात “संविधान रॅली” मोठ्या उत्साहात लोकसत्ताक दिन साजरा….!

49

जल्लोषात “संविधान रॅली” मोठ्या उत्साहात लोकसत्ताक दिन साजरा….!

जल्लोषात "संविधान रॅली" मोठ्या उत्साहात लोकसत्ताक दिन साजरा....!

गुणवंत कांबळे, मुंबई प्रतिनिधी
मो. नं.९८६९८६०५३०

……………………………………….

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
भारतीय लोकसत्ताक संघटना आणि व्ह्यू आर इंडियन्स च्या वतीने

१ ) दादर चैत्यभूमी ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा कुपरेज.

२) घाटकोपर रमामाई आंबेडकर कॉलिनी ते डॉ बाबासाहेब आंबेडकर गार्डन चेंबूर.

३)बांद्रा ते चैत्यभूमी दादर.
याठिकाणी संविधान रॅलीचे मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
……………………………………….

जल्लोषात "संविधान रॅली" मोठ्या उत्साहात लोकसत्ताक दिन साजरा....!

मुंबई- लोकसत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी २०२३ रोजी ठीक.आकरा वाजता ‘संविधान रॅली’ आधुनिक भारताचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून संविधान उद्देशिका सामूहिक वाचन करून संविधान रॅलीची सुरुवात मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरी करण्यात आली.

जल्लोषात "संविधान रॅली" मोठ्या उत्साहात लोकसत्ताक दिन साजरा....!

मी भारतीय…!🇮🇳
संसदीय लोकशाही राज्य प्रणाली ही सर्वोत्तम राज्य प्रणाली आहे, हा माझा विश्वास आहे…!
ही टॅग लाईन घेऊन,भारतीय लोकसत्ताक संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे प्रत्येक विभागात वाचन करण्यात आले.

२६ जाने. १९५० रोजी भारतीय संविधान लागु करण्यात आले. तो दिवस आपण ‘लोकसत्ताक दिन’ म्हणून देशभर साजरा करतो. या लोकसत्ताक दिनानिमित्त आम्ही संविधानाच्या प्रचार प्रसारासाठी व लोकसत्ताक दिवस मोठया प्रमाणात जनतेमध्ये साजरा करण्यासाठी देशात बंधुत्व व शांततेचा संदेश पोहचवण्यासाठी तसेच आज देशामध्ये धार्मिक, जातीय, भाषिक, प्रांतिक दंगली घडत आहेत या पार्श्वभूमीवर ‘भारतीयत्व हेच बंधुत्व’ हा संदेश देण्यासाठी दर वर्षी “संविधान रॅलीचे” आयोजन गेले ११ वर्ष केले जाते.

भारतीय लोकसत्ताक संघटनेचे अध्यक्ष मा. अमोलकुमार बोधिराज सर यांनी लोकसत्ताक दिनाचे महत्व तसेच तो दिवस देशातील नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे हे पटवून सांगितले. त्याच बरोबर संविधानाची अंमलबजावणी होण्यास तसेच संविधानाचा प्रचार आणि प्रसार करण्यास आपण सर्वांनी कटिबद्ध राहूया असा संदेश भारतीय नागरिकांना देण्यात आला.

मुंबई आणि उपनगर या ठिकाणी संविधान रॅलीला राजकीय,सामाजिक धार्मिक कार्यकर्ते व सेलिब्रिटी,आणि महिलांचा,मुलांचा जास्त प्रमाणात भाग होता तसेच आदी मान्यवर उपस्थित होते या संविधान रॅलीमध्ये मी भारतीय नागरिक म्हणून हजारोंच्या संख्येने सहभाग दर्शवला होता.

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳